Vipreet Rajyog In Kundli: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या गोचरमुळे शुभ आणि अशुभ योग तयार होतात. ज्याचा प्रभाव मानवी जीवनावर आणि देश आणि जगावर दिसून येतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्रहांचा राजकुमार बुध सध्या नीच अवस्थेत आहे. याशिवाय मीन राशीत त्याचा उदय देखील झाला आहे. बुध या ठिकाणी विपरिज राजयोग निर्माण करतोय. यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकते. काही राशींच्या आयुष्यात सुख समृद्धी येणार आहे, तर काही राशींना धनलाभ होऊ शकतो. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना यावेळी लाभ होणार आहे. 


मेष रास (Aries Zodiac)


मेष राशीच्या लोकांसाठी विपरिज राजयोग फायदेशीर ठरू शकतो. यावेळी तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्ही शेअर बाजार आणि सोने-चांदीशी संबंधित काम केले तर तुम्हाला त्यात चांगला नफा मिळू शकतो. या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. मालमत्तेच्या व्यवहारातून लाभ होईल. गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. 


सिंह रास (Leo Zodiac)


विपरित राजयोग तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतो. कंत्राटी पद्धतीने काम केल्यास लाखो-कोटींच्या निविदा निघू शकतात. निर्यात आणि आयातीच्या कामात फायदा होऊ शकतो. वडिलांशी तुमचे संबंध चांगले राहतील. सरकारी आणि राजकारणातील उच्च अधिकाऱ्यांशी चांगले संबंध निर्माण होणार आहेत. तुम्हाला हवाला कामात चांगला नफा मिळू शकतो.


तूळ रास (Tula Zodiac)


तूळ राशीच्या लोकांसाठी उत्पन्न आणि गुंतवणुकीच्या बाबतीत विपरित राजयोग शुभ सिद्ध होऊ शकतो. यावेळी तुम्हाला गुंतवणुकीतून आर्थिक लाभ मिळेल. तुम्हाला शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये चांगला नफा मिळू शकतो. तुम्ही यावेळी नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर यावेळी तुमचे स्वतःचे काम सुरू होऊ शकते. आवडीच्या कोणत्याही ठिकाणी पोस्टिंग मिळवू शकता.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )