लोकांच्या सतर्कतेने Ford EcoSport SUVमुळे होणारा मोठा अपघात टळला
सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हायरल होत असतं. त्यात काही मजेदार व्हिडीओ व्हायरल होतात, तर काही महत्वाचे असतात.
मुंबई : सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हायरल होत असतं. त्यात काही मजेदार व्हिडीओ व्हायरल होतात, तर काही महत्वाचे असतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये लोकं एका गाडीला सरळ करत आहे. या व्हिडिओचे व्हायरल होण्याचे कारण असे की, नेहमी रस्त्यावर भांडणारे आणि बघ्याची भूमीका घेणारे लोकं चक्कं गाडीला सरळ करण्यासाठी एकमेकांची मदत करत आहेत.
EcoSport गाडी रस्त्यावर पलटी झाली होती, त्यानंतर 14 लोकं आणि एक पोलिस कर्मचारी त्या EcoSport कारला सरळ करण्याचा प्रयत्न करत आहेत. करण जर ही कार अशीच राहिली तर तिला आग लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मग सगळ्या लोकांनी मिळून गाडीला सुरवातीला एका बाजूला आले आणि पलटी मारलेल्या कारला दरवाज्याच्या बाजूने पलटी केले आणि ती कार आडवी झाली.
ही कार पलटी कशी झाली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही, कारण कोणत्याही गोष्टीला धक्का लागल्याचा किंवा काही तुटल्याची खून कुठेही दिसली नाही. परंतु कदाचीत पावसामुळे रस्त्यावरुन गाडीचा तोट जाऊन तिने पलटी मारली असावी.
यात महत्वाची गोष्ट आशी की, गाडीतील कोणालाही काही झालेलं नाही. प्रत्येकजण सुखरूप बाहेर आला. तसेच या गाडीच्या दरवाज्याला देखील काहाही झाले नाही. सहसा, जेव्हा कार उलटते तेव्हा छप्पर आत जाते आणि दरवाजे काम करत नाहीत. परंतु EcoSport कार तशी भक्कम आहे.
जरी इकोस्पोर्ट अतिशय स्थिर कार असली तरी, इतर एसयूव्हीप्रमाणेच तिचा टॉप जड आहे. यामुळे, एसयूव्ही एका बाजूला झूकण्याची आणि पडण्याची शक्यता आहे.