Kanya Rashi Yearly Predictions : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाला मोठं महत्त्व आहे. सध्या कन्या राशीवर बुध ग्रहाचं वर्चस्व आहे. . बुधाला ग्रहांचा राजकुमार म्हणतात. तर बुध हा बुद्धिमत्ता, संचार, बँकिंग, वाणी, अर्थव्यवस्था आणि व्यवसायाचा दाता मानला जातो. जानेवारी 2024 पासून कन्या राशीच्या संक्रमण कुंडलीतील ग्रहांची स्थिती अधिक मजबूत होताना दिसत आहे. बुध आणि शुक्र तिसऱ्या घरात स्थित असेल. याशिवाय मंगळ आणि सूर्य चौथ्या भावात शनिदेवासह सहाव्या घरात असतील. राहू सातव्या भावात, गुरु आठव्या भावात आणि राहु ग्रह बाराव्या भावात असेल. कन्या राशीच्या लोकांसाठी 2024 हे वर्ष कसं असेल? जाणून घेऊया...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कन्या राशीसाठी कशी असेल आर्थित स्थिती?


कन्या राशीसाठी वर्षाचे पहिले दोन महिने आर्थिकदृष्ट्या किचकट ठरू शकतात. मात्र, एप्रिलपासून कन्या राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळेल. शनिदेव सहाव्या भावात असल्याने चांगला लाभ होईल. सर्वत्र यश मिळाल्यानंतर  पैश्यांची चिंता मिटेल. एप्रिलनंतर तुम्ही एखादी मालमत्ता किंवा वाहन खरेदी करू शकता.


कन्या राशीच्या लोकांचं करिअर


कन्या राशीच्या लोकांसाठी 2024 हे वर्षा सर्वलाभी असणार आहे. या वर्षीच्या सुरूवातीला विद्यार्थ्यांना कमी भाग्य लाभेल. परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मात्र, एप्रिल किंवा मे नंतर शनीदेव आणि गुरूच्या एन्ट्रीमुळे परदेशी प्रवासाची समस्या राहणार नाही. तर तुम्ही जॉब किंवा व्यवसाय करत असाल तर फेब्रुवारीमध्ये नवी संधी मिळेल. त्याचा फायदा घ्या. नव्या लोकांना सामाविष्ठ करून घ्या. नव्या मार्गांवर झेप घेण्यासाठी नक्की विचार करा. 


वैवाहिक जीवन आणि नातेसंबंध


वैवाहिक जीवनाबाबत आगामी वर्ष हे कन्या राशीसाठी संमिश्र असण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या कामातून वेळ काढून जोडीदारासाठी वेळ काढावा लागेल. त्यांची अधिक काळजी घ्यावी लागेल. सप्तम भावातील राहू नात्यात कटुता निर्माण करू शकतो. मात्र, तुमच्या प्रयत्नातून तुम्ही दु:ख दुर करू शकता. वर्षाच्या अखेर किशोरवयीन मुलामुलींसाठी लग्नासाठी स्थळ देखील येऊ शकतात. घरात धार्मिक मंगलकार्य देखील होऊ शकतं.


दरम्यान, कन्या राशीच्या लोकांसाठी 2024 मध्ये 5 आणि 6 हे लकी नंबर असतील. तुम्हाला आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावं लागेल. मधल्या कालावधीत आरोग्यावर लक्ष द्यावं लागेल. मात्र, वर्षाअखेर सर्वकाही सुरळीत होती. एकंदरीत वर्षाच्या सुरूवातीला आर्थिक टंचाई जाणवेल. वर्षाच्या मध्यात आरोग्याच्या समस्या आणि करियरमध्ये नवी उंची गाठाल. सप्टेंबरच्या जवळपास नव्या संधीचा फायदा घ्याल अन् वर्षाअखेर तुम्ही आयुष्याच्या वळणावर असणार आहात.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)