Wednesday Remedies : बुध ग्रहाला शांत करायला आज करा गणरायाची पूजा, `हे` उपाय केल्यास व्हाल श्रीमंत
Budhwar Pooja : बुधवार बुध ग्रहाला समर्पित आहे. ज्या लोकांचा बुध कमजोर आहे, त्यांनी या दिवशी पूजा, उपासना, व्रत तुमचा बुध ग्रह मजबूत करु शकतो. त्यामुळे बुधवारी करा हे ज्योतिषशास्त्रात सांगितलेले उपाय...
Wednesday Remedies in marathi : आज बुधवार...हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केला जातो. आज श्रीगणेशाची उपासना करण्याचा दिवस आहे. जर तुमच्या कुंडलीतील बुध दोष असतील आणि ते दूर करण्याचे असतील तर आजचा दिवस खास आहे. (Lord Ganesha) या दिवशी गणेशाची पूजा केल्याने जीवनात सुख-समृद्धी तर येतेच, सोबतच बुधाचे दोषही दूर होतात. जीवनातील यशामागे बुध ग्रहाचे विशेष योगदान मानलं गेलं आहे. आज काही विशेष उपाय करून तुम्ही कुंडलीत बुध ग्रहाची स्थिती मजबूत करून नोकरी-व्यवसायाला नवी उंची देऊ शकता. (Wednesday Remedies ganesh pooja budhwar pooja strengthens mercury upay in marathi)
बुध ग्रहाची शुभ आणि अशुभ स्थिती कशी जाणून घ्या
ज्याचा बुध ग्रह कमजोर असेल त्याला सौंदर्य किंवा त्वचेशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.
जर तुमच्या कुंडलीत बुध ग्रह कमजोर असेल तर तुमचं सौंदर्य कमी होऊ लागतं.
जर तुमचा बुध ग्रह कमजोर असेल तर तुमची लक्षात ठेवण्याची क्षमता कमी होऊ लागते.
तुम्ही इतरांशी चुकीच्या पद्धतीने बोलू लागाल, तुमचं बोलणं गोड राहत नाही.
'बुध' हा ग्रहांचा राजकुमार
जर तुमचा बुध मजबूत असेल तर तुम्ही नेहमी तरुण दिसाल.
तुमचा चमकणारा चेहरा ही बलवान बुधाची ओळख आहे.
जर तुम्हाला सुगंध आवडत असेल तर तो तुमचा मजबूत बुध दाखवतो.
जर तुम्हाला सर्व काही आठवत असेल तर ती बलवान बुधाची ओळख आहे.
बुध ग्रहासाठी उपाय
बुधवारी उपवास करा.
हे व्रत 45, 21 किंवा 17 बुधवारपर्यंत पाळावे.
या दिवशी हिरव्या रंगाचे कपडे घाला.
हिरवे कपडे परिधान करून 'ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम:' या मंत्राचे 17, 5 किंवा 3 फेरे जपावेत.
जेवणापूर्वी चरणामृत किंवा गंगेच्या पाण्यासोबत तुळशीची तीन पाने खावीत आणि नंतर जेवावे.
या व्रताच्या दिवशी हिरवे पदार्थ खावेत.
बुधवारची कथा ऐकून प्रसाद घ्यावा.
या व्रताचे पालन केल्याने ज्ञान आणि धनाचा लाभ होतो.
व्यवसायात प्रगती होऊन शरीर निरोगी राहते.
बुध ग्रहाच्या शांतीसाठी बुधवारी व्रत करावे. या दिवशी गणेशाला दुर्वा घास अर्पण करावा. यासोबतच गणेशाच्या मंत्रांचा जप करावा. असे केल्याने तुमच्या सर्व समस्या कमी होतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)