मुंबई : ज्योतिषशास्त्रात आठवड्यातील सात दिवसांचे कारक ग्रह वेगवेगळे सांगितले आहेत. व्यक्तीच्या जन्मवारावरुन त्याच्या स्वभावाबद्दलची वैशिष्ट्ये सांगता येतात. जाणून घ्या जन्मवारावरुन व्यक्तीचा स्वभाव


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवार - रविवारी जन्माला येणाऱ्या व्यक्तींना नशिबाची साथ मिळते. याचे आयुष्यही मोठे असते. अशा व्यक्तींना कमी बोलायला आवडते. कला आणि शिक्षण क्षेत्रात या व्यक्ती मानसन्मान प्राप्त करतात. कुटुंबातील व्यक्तींना नेहमी आनंदी राखण्यासाठी प्रयत्नशील असतात. 


सोमवार - सोमवारी जन्मणाऱ्या व्यक्ती नेहमी हसतमुख आणि गोड बोलणाऱ्या असतात. सुख असो वा दु:ख नेहमी आशावादी असतात. या व्यक्ती हुशार तसेच चपळ असतात. या व्यक्तींना कफाचा त्रास नेहमी सतावतो. यांना आयुष्यात सर्व सुख-सुविधा मिळतात. 


मंगळवारी - ज्यांना जन्म मंगळवारी झाला आहे अशा व्यक्ती रागीट स्वभावाच्या असतात. यामुळेच आजूबाजूच्या अनेक लोकांशी यांचे वाद होतात. यांना रक्त तसेच त्वचेशी संबंधित आजार सतावतात. यांच्या आयुष्यात सुख-दुख: येत जात असतात. 


बुधवार - बुधवारी जन्मणाऱ्या व्यक्तींना धर्माची विशेष आवड असते. या व्यक्ती बुद्धिमान आणि गोड बोलणाऱ्या असतात. आई-वडिलांची विशेष काळजी घेतात. यांना मूर्ख बनवणे सोपे नसते. 


गुरुवार - ज्यांचा जन्म गुरुवारी झालाय अशा व्यक्ती बुद्धिमान आणि साहसी असतात. कोणत्याही कठीणप्रसंगाला मोठ्या धीराने तोंड देतात. चांगली संगत असलेले मित्र लाभतात. यांना नशिबाची साथ मिळते. 


शुक्रवार - शुक्रवारी जन्मणाऱ्या व्यक्ती हसतमुख आणि बुद्धिमान असतात. आपल्या वकृत्वकौशल्याने समोरच्या व्यक्तींना प्रभावित करतात. कला क्षेत्रात मोठी कामगिरी करतात. 


शनिवार - ज्या व्यक्तींचा जन्म शनिवारी झालाय या व्यक्ती कृषी, व्यापार अथवा तांत्रिक क्षेत्रात चांगली कामगिरी करतात. अशा व्यक्तींनी मित्रांपासून सावध रहावे. अशा व्यक्तींना आई-वडिल, भाऊ-बहीण यांच्याकडून सुख मिळत नाही.