Weekly Horoscope : शनि उदय `या` राशींसाठी ठरणार भाग्यशाली, पाहा या आठवड्याचं राशीभविष्य
Saptahik Rashi Bhavishya 18 To 24 March 2024 : मार्च महिन्यातील तिसरा आठवडा हा वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अतिशय महत्त्वाचा आहे. कुंभ राशीत शनि उदय आणि मीन राशीत सूर्य आणि बुध यांची युती होणार आहे. सूर्य आणि बुधमुळे बुधादित्य राजयोग निर्माण होणार आहे. ग्रहांचा हे संयोग काही राशीसाठी शुभ तर काहींसाठी अडचणी निर्माण करणार आहे.
Weekly Horoscope 18 To 24 March 2024 : मार्च महिन्याचा हा तिसरा आठवडा कोणासाठी सकारात्मक आणि कोणासाठी अडचणीचा असणार आहे, याबद्दल वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सांगण्यात आलंय. कुंभ राशीत शनी उदय तर मीन राशीत सूर्य बुध यांची युतीतून बुधादित्य राजयोग तयार होत आहे. या आठवड्यात रविवारी होलिका दहन असणार आहे. यादिवशी शुक्र आणि मंगळाचा संयोग काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. ज्योतिषी आनंद पिंपळकर यांच्याकडून या आठवड्याचे आर्थिक राशीभविष्य जाणून घ्या. (Weekly Horoscope 18 To 24 march 2024 Check Weekly Horoscope Astrology Predictions Zodiac Signs Saptahik Rashi Bhavishya in Marathi)
मेष (Aries Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत खूप शुभ सिद्ध होणार आहे. या लोकांच्या संपत्तीत वाढ होणार आहे. या आठवड्यामध्ये खरेदीच्या मूडमध्ये असणार आहात. कामाच्या ठिकाणी मनाचं ऐकून निर्णय घ्या तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील. घरामध्ये बाहेरील लोकांचे हस्तक्षेप होऊ देऊ नका. या आठवड्यात अचानक तुम्हाला प्रवास घडणार आहे. ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होणार आहे. या आठवड्यात एका कार्यक्रमात सहभागी होणार आहात. ज्येष्ठांच्या आशीर्वादाने जीवनात सुख-समृद्धीच्या संधी तुम्हाला लाभणार आहेत.
शुभ दिवस: 18,22
वृषभ (Taurus Zodiac)
या राशीचे लोक त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगती करणार आहेत. तर ज्येष्ठांच्या आशीर्वादाने जीवनात सुख-समृद्धीचे शुभ संयोग घडणार आहेत. या आठवड्यात आर्थिक खर्च दुप्पटीने वाढणार आहे. कुटुंबात शांतता राखण्यासाठी तुम्हाला संयम बाळगाव लागणार आहे. नियम आणि संयमात राहू निर्णय घेतल्यास तुम्हाला फायदा होईल. या आठवड्यातील प्रवासातून तुम्हाला त्रास होईल त्यामुळे प्रवास टाळा. तर एखाद्या मातृ स्त्रीच्या मदतीने आयुष्यात आनंद द्विगुणीत होणार आहे.
शुभ दिवस: 19,22
मिथुन (Gemini Zodiac)
या राशीच्या लोकांचे आर्थिक गणित बिघडणार असून त्यांनी त्यावर लक्षकेंद्रीत करावे. त्याशिवाय हा आठवडा तुमच्यासाठी खूप जास्त व्यस्त असणार आहे. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला या आठवड्यात मिळणार आहे. अचानक कुठून तरी पैसा मिळणार आहे. कुटुंबात आनंद आणि परस्पर प्रेम वाढवणाऱ्या घटना घडणार आहेत. या आठवड्यात तुम्हाला अशा व्यक्तीकडून मदत मिळणार आहे, ज्यांची आर्थिक परिस्थिती बक्कळ असेल. प्रवासात निष्काळजीपणा टाळा. आठवड्याच्या शेवटी तुम्ही पार्टी करणार आहात.
शुभ दिवस: 18,19,20,22
कर्क (Cancer Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी आठवडा आर्थिक बाबतीत शुभ असणार आहे. या आठवड्यातील प्रवासातून तुमचा सन्मान वाढणार आहे. जोडीदारासोबत एखाद्या सुंदर ठिकाणी फिरायला जाणार आहात. कामाच्या ठिकाणी थोडा अडचणी निर्माण होणार आहेत. आर्थिक बाबतीत बोलायचं झालं तर या आठवड्यात खर्च अधिक होणार आहे. शिवाय तुम्ही कुठली गुंतवणूक केली असेल तर त्याकडे लक्ष केंद्रीत करा. स्वतःवर विश्वास ठेवून घेतलेले निर्णय घेतल्यास तुम्हाला फायदा होईल.
शुभ दिवस: 19, 21
सिंह (Leo Zodiac)
या राशीचे लोक त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगती करणार आहेत. एखाद्या स्त्रीच्या मदतीने तुम्ही तुमचा प्रकल्प वेळेवर पूर्ण करणार आहात. आर्थिक बाबतीतही वेळ अनुकूल असल्याने भविष्यासाठी केलेली गुंतवणूक तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या सहवासात आनंददायी वेळ व्यतित करणार आहात. या आठवड्यात तुम्ही लांबचे प्रवास करु नका अन्यथा अनावश्यक खर्चाचा बोजा तुमच्यावर पडेल. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला आळशीपणा जाणवणार आहे.
शुभ दिवस: 18,19,20
कन्या (Virgo Zodiac)
या राशीच्या लोकांचे प्रकल्प या आठवड्यात वेळेवर पूर्ण होणार आहे. करिअरमध्ये यशाचे शिखर तुम्ही गाठणार आहात. भागीदारीत केलेले काम तुम्हाला सकारात्मक परिणाम देईल. आर्थिकदृष्ट्याही हा आठवडा चांगला असणार आहे. कुठलीही गुंतवणूक करताना शांतपणे आणि काळजीपूर्वक करा. जवळची व्यक्ती हॉस्पिटलमध्ये असल्याने त्यांच्या भेटीला तुम्ही जाऊ शकता. कुटुंबात सुख समृद्धी नांदणार आहे. प्रवासातून तुम्हाला शुभ परिणाम मिळणार आहेत.
शुभ दिवस: 18,20,21,22
तूळ (Libra Zodiac)
या राशीचे लोक त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगती करणार आहेत. त्यांच्या मान सन्मान वाढणार आहे. तुमचे विरोधकही तुमची प्रशंसा करणार आहेत. आर्थिक सुबत्तेसाठी मनाचे ऐकून निर्णय घेतल्यास सुख-समृद्धी तुमचं दार ठोठवणार आहे. या आठवड्यात तुम्ही सहली पुढे ढकलल्यास शुभ परिणाम मिळतील. या आठवड्यात तुम्हाला कौटुंबिक बाबींमध्ये काही मोठे निर्णय घ्यावे लागू शकतात. आरोग्याकडेही दुर्लक्ष करु नका.
शुभ दिवस: 22
वृश्चिक (Scorpio Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रगतीचा असणार आहे. प्रियजनांसोबत आनंददायी वेळ व्यतित करणार आहात. या आठवड्यातील प्रवासही तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. मात्र आर्थिक गणिताबद्दल बोलायचं झालं तर ती थोडी बिघडणार आहे. तुमच्या अनावश्यक खर्च वाढणार आहे. अगदी या आठवड्याच्या शेवटी तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे.
शुभ दिवस: 20,21
धनु (Sagittarius Zodiac)
या राशीच्या लोकांनी आर्थिक बाबतीत समतोल राखल्यास फायदा होईल. आयुष्यात सुख-समृद्धीचे योग आहेत. आर्थिक बाबतीत खूप मेहनत करावी लागणार आहे. पण कालांतराने तुम्हाला मेहनतीचं फळ मिळणार असून उत्पन्न वाढणार आहे. प्रवास तुमचा आरामशीर होणार आहे. कामाच्या ठिकाणी संवादाने मुद्दे सोडवल्यास फायदा होईल. रखडलेला प्रकल्प पुन्हा चालना मिळणार आहे.
शुभ दिवस: 20,21
मकर (Capricorn Zodiac)
या राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य लाभणार आहे. नोकरीच्या ठिकाणी प्रगतीच्या संधी तुम्हाला उंच शिखरावर घेऊन जाणार आहे. या आठवड्यात सहली पुढे ढकलणे चांगले परिणाम देणार आहे. गुंतवणुकीकडेही लक्ष दिल्यास ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल..या आठवड्यात जास्त पैसे खर्च होणार असल्याने त्याबद्दल सतर्क राहा. न्यायालयीन प्रकरण तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे.
शुभ दिवस: 13,15
कुंभ (Aquarius Zodiac)
या राशीच्या लोकांना या आठवड्यात आर्थिक प्रगतीचा असणार आहे. या आठवड्यात नशीब तुमच्या बाजूने असल्याने हवं ते काम होणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचं सततचं प्रयत्न तुमच्या जीवनात आनंद आणि शांती घेऊन येणार आहे. प्रकल्पांमध्येही यश दिसत असल्याने तुम्ही आनंदी असणार आहात. कुटुंबात आनंदाचे आणि सौहार्दाचे शुभ संयोग असणार आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगल्या भविष्यासाठी नियोजनबद्ध मूडमध्ये असाल. या आठवड्यात तुम्ही सहली पुढे ढकलल्यास चांगल होईल. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला काही नुकसान होणार आहे.
शुभ दिवस: 11,13
मीन (Pisces Zodiac)
या राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत नशिबाची साथ लाभणार आहे. तुम्ही तुमच्या कामात थोडी रिस्क घेतल्यास यश तुमच्या पायाजवळ असेल. प्रगतीचे मार्गही खुले झाल्यामुळे तुम्ही मागे वळून पाहणार नाहीत. आर्थिक बाबतीत, कोणत्याही कागदपत्रावर काळजीपूर्वक वाचूनच मगच सही करा. नाहीतर तुमची डोकेदुखी ठरू शकते. कुटुंबातील एक नवीन सुरुवात तुमच्या जीवनात शांतता प्रदान करणार आहे. तुम्ही तुमच्या प्रियजनांच्या सहवासात आनंददायी वेळ घालवणार आहात.
शुभ दिवस: 13,14
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)