Weekly Horoscope 25 To 31 March 2024 : मार्च एंडिंग किंवा मार्च क्लोजिंगचा हा शेवटचा आठवडा. होळीच्या रंगांने या आठवड्याची सुरुवात झाली आहे. होळीच्या रंगांसोबत या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण सोमवारी असल्याने मार्चचा हा शेवटचा आठवडा 12 राशींसाठी आनंदी वास्तू आणि ज्योतिषशास्त्र पंडीत आनंद पिंपळकर यांनी सांगितलंय. जाणून घ्या या आठवड्याच साप्ताहिक राशीभविष्य (weekly horoscope 25 to 31 march 2024 check weekly horoscope astrology predictions zodiac signs saptahik rashi bhavishya in marathi) 


मेष (Aries Zodiac)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारी काम करणाऱ्यांनी काात लक्ष द्यावे, कारण त्यांना वरिष्ठ अधिकारी काही प्रश्न विचारु शकता. व्यवसायिकांना आर्थिक लाभ होणार असून एखादा करार होणार आहे. ज्या लोकांना बदलची अपेक्षा आहे त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. कुटुंबातील लहान व्यक्तीचा सल्ला उपयोगी पडणार आहे. होळीचा आनंद असणार आहे. पण सर्दी खोकल्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे पाण्यापासून दूर. आर्थिक बाबींचा विचार केल्यास या आठवड्यात कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊन नका. शिवाय तुमचा खर्च वाढणार आहे. 


शुभ दिवस: 27,29


वृषभ (Taurus Zodiac) 


या लोकांनी कामात सावधगिरी बाळगावी, वरिष्ठांकडून कामाचं आढावा घेतला जाणार आहे. व्यवसायिकांनी कामात कमी पडू नका, तुम्हाला आर्थिक फायदा होईल. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणाकडून पैसा उसणे घेऊ नका. नातेसंंबंधात आनंद असणार आहे. या आठवड्यात त्वचेची काळजी घ्या. तर हा आठवडा आर्थिक खर्चाचा असणार आहे. त्यामुळे मन अस्वस्थ असणार आहे. 


शुभ दिवस: 26,28


मिथुन (Gemini Zodiac)


या लोकांनी कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसह सहकार्यासोबत चांगले संबंध ठेवा. तर व्यापारी लोकांनी कामाच्या ठिकाणी कागदपत्राबद्दल काळजी घ्या. वाचल्याशिवाय कुठल्याही कागदावर सही करु नका. तुमच्या अपेक्षेनुसार कुटुंबातून तुम्हाला सहकार्य मिळणार आहे. आरोग्य उत्तम राहणार आहे. वजनाच्या समस्या दूर होणार आहे. आर्थिक बाबीत हा आठवडा खर्चिक ठरणार आहे. 


शुभ दिवस: 27,28


कर्क (Cancer Zodiac)  


या लोकांचा या आठवड्यात सुट्टीचा मूड असणार आहे. आयात निर्यात क्षेत्रातील व्यवसायिकांचे बोट तुपात बुडालेले असणार आहे. मित्राकडे सणासुदीचे निमंत्रण तुम्हाला मिळणार आहे. घरात आनंदाच वातावरण असणार आहे. वडिलांचं वागणं तुम्हाला खट्टकणार आहे. आरोग्यासाठी घरगुती उपाय तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. आर्थिक बाबतीत हा आठवडा आनंदी असणार आहे. 


शुभ दिवस: 28,29


सिंह (Leo Zodiac) 


हा आठवडा तुमच्यासाठी आनंदी असणार आहे. मात्र आठवड्याच्या शेवटी कामाचा ताण अचानक वाढतो. व्यावसायिकांनी कामात जोखीम घेऊ नका. कुठल्याही गुंतवणुकीत शंका असेल तर ती टाळा. मित्राकडून विश्वासघात होऊ शकते. कोणावरही आंधळे विश्वास ठेवू नका. तुम्हाला अपचनाचा त्रास होऊ शकतो. तर आर्थिक बाबीवर लक्ष केंद्रित करा. 


शुभ दिवस: 25,28


कन्या (Virgo Zodiac)  


या लोकांना आत्म विश्लेषण करण्याची संधी मिळली आहे, त्यामुळे तुमच्यामधील उणीवा दूर करा. व्यावसायिकांनी करार करताना काळजी घ्यावी. ज्यातून तुम्हाला नफा मिळणार आहे अशी आशा वाटत आहे तिथे तुमचं नियोजन चुकू शकतं. तरुणांनी स्वत:ला श्रेष्ठ समजण्याची चूक टाळा. नाही तर लोक तुम्हाला अहंकारी समजतील. कुटुंबातील वातावरण संमिश्रीत असणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला आनंद वाटणार आहे. व्यायाम करा म्हणजे शारीरिक स्थितीती चांगल राहणार आहे. या आठवड्यात तुमचा खर्च वाढणार आहे.


शुभ दिवस: 26,27,28


तूळ (Libra Zodiac)  


या लोकांनी कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसोबतचे वाईट संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करा. व्यापारी लोकांसाठी आर्थिक लाभाचा हा आठवडा ठरणार आहे. कोणत्याही क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना फायदा होणार आहे. वैवाहिक जीवनात आनंदासाठी हा आठवडा शुभ असणार आहे. कानाशी संबंधित समस्या उद्धभवू शकते. कोणत्याही कागदावर सही करताना काळजी घ्या.


शुभ दिवस: 26,28,29


वृश्चिक (Scorpio Zodiac)  


शेअर बाजाराशी संबंधित हा आठवडा संमिश्र असणार आहे. व्यापारी वर्गातील लोकांसाठी सोशल नेटवर्किंग फायदेशीर ठरणार आहे. जोडप्यांना त्यांच्या नात्यात पुन्हा सकारात्मक बदल जाणवणार आहेत. जुने नातेसंबंध पुनर्विकास आणि सुधारणार आहेत. डोळ्याशी संबंध आजाराशी काळजी घ्या. आर्थिक बाबींमध्ये या आठवड्यात अधिक खर्चिक ठरणार आहे. 


शुभ दिवस: 27,28


धनु (Sagittarius Zodiac) 


या राशीच्या लोकांच्या करिअरवर कौटुंबिक बाबींचा मोठा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. व्यवसाय भागीदाराशी चर्चा केल्यानंतरच पुढी कामं करा. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यासाठी चांगला दिवस आहे. मुलांशी आणि घरातील इतर सदस्यांशी खूप कठोर वागू नका. त्वचेबद्दल काळजी घ्या. लोकांसाठी आर्थिक दृष्टीकोनातून संपत्तीत वाढ होणार आहे. 


शुभ दिवस: 25


मकर (Capricorn Zodiac)   


या लोकांनी कामाकडे दुर्लक्ष करुन इतरांवर टीका करण्यात तुमचा वेळ घालवू नका. व्यापारी लोकांना आर्थिक लाभ होणार आहे. उपजीविकेच्या क्षेत्रात सक्रिय असलेल्या तरुणांना परदेशी कंपनीत कामाची संधी मिळणार आहे. तुमच्या लाजाळू स्वभावामुळे कोणाला मदत मागायला मागेपुढे पाहू नका. चिंतेमुळे तब्येतीत कमी जास्त होणार आहे. आर्थिक खर्च वाडणार आहे. 


शुभ दिवस: 26,28


कुंभ (Aquarius Zodiac) 


या लोकांनी काम करण्यापूर्वी आणि काम केल्यानंतर वरिष्ठांशी संवाद साधावा. ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. मालमत्तेचे व्यवहार करताना खास करुन जमीन खरेदी करण्यापूर्वी सगळी माहिती गोळा करुन घ्या. तरुणांनी अर्धवट आणि ऐकलेल्या गोष्टींवरुन कुठलंही काम करु नका. या आठवड्यात उत्पन्नापेक्षा जास्त खर्च होणार आहे. रिकाम्या पोटी राहू नका कारण तुम्हाला पोटाशी संबंधित समस्या होऊ शकतात. आर्थिक बाबतीत परिस्थिती सुधारणार आहे. 


शुभ दिवस: 25,29


मीन  (Pisces Zodiac)  


तुमच्या अहंकारी स्वभावामुळे इतरांचे मनं दुखवू नका. या आठवड्यात व्यावसायिकांनी प्रवास करु नयेत. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं गुणगाण करा. कुठल्याही क्षेत्रातील करिअरमधील लोकांना यश प्राप्त होणार आहे. कुटुंबाप्रती तुमजी जबाबदारीने सर्वांची काळजी घ्या. भाऊ बहिणीच्या आरोग्याकडे लक्ष द्या. तुम्हाला नवीन गुंतवणुकीतून लाभ होणार आहे. 


शुभ दिवस: 26,27,28,29


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)