Weekly Horoscope 3 to 9 june 2024 in Marathi : जूनचा पहिला आठवडा ग्रह आणि नक्षत्रांच्या दृष्टीने फायदेशीर असणार आहे.शुक्रादित्य राजयोग आणि बुधादित्य राजयोगाचा दुहेरी संयोग काहींसाठी सकारात्मक तर काहींसाठी नकारात्मक ठरणार आहे. अशात मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी एकंदरीत हा आठवडा असा जाईल जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य ज्योतिषशास्त्र पंडीत आणि आनंदी वास्तूचे आंनद पिंपळकर


मेष (Aries Zodiac)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष राशीच्या लोकांसाठी जूनचा पहिला आठवडा संमिश्र असणार आहे. या आठवड्यात या लोकांनी छोट्या-छोट्या गोष्टींवरून उत्तेजित होऊ नका. विशेषत: कामाच्या ठिकाणी कोणाशीही वाद घालू नका. अन्यथा तुम्ही मोठ्या अडचणीत सापडाल. या आठवड्यात करिअर आणि व्यवसायाशी संबंधित समस्या टाळण्यासाठी लोकांसोबत सकारात्मक काम करा. आठवड्याच्या मध्यात तुमचे मन थोडे विचलित होऊ शकतं. या काळात तुम्हाला कौटुंबिक बाबींमध्ये निर्णय घेताना अडचणी येतील. पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा. या काळात कोणत्याही कागदावर न वाचता सही करु नका. तुमच्या प्रेम जीवनात विचारपूर्वक पुढे जा. वैवाहिक जीवनात तुमच्या जोडीदाराचे आरोग्य चिंतेचा विषय बनू शकते. आहाराकडे लक्ष द्या. 
शुभ दिवस: 4


वृषभ (Taurus Zodiac) 


या राशीच्या लोकांना जूनच्या पहिल्या आठवड्यात पैसे आणि वेळेचे व्यवस्थापन करावेत. या आठवड्यात तुमच्याकडे विविध स्त्रोतांकडून पैशाची आवक होणार असली तरी अधिक खर्च होणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला घराची सजावट, मुलांच्या गरजा आणि पर्यटन इत्यादींवर मोठा खर्च करावा लागणार आहे. नोकरदार लोकांवर कामाचा ताण जास्त असणार आहे. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला तुमच्या करिअर किंवा व्यवसायाच्या संदर्भात अचानक प्रवास घडणार आहे. या काळात मोसमी आजारांपासून सावध राहून गाडी चालवा. लव्ह लाईफच्या दृष्टीने हा आठवडा तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. वैवाहिक जीवन आनंदी असेल. 
शुभ दिवस: 3,7


मिथुन (Gemini Zodiac)


या राशीच्या लोकांसाठी जूनचा पहिला आठवडा शुभ आणि भाग्यशाली असणार आहे. आठवड्याच्या पहिल्या भागात तुमची कोणतीही मोठी इच्छा पूर्ण झाल्यास कुटुंबात आनंदाचे वातावरण असणार आहे. नोकरदार लोकांना नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचे पूर्ण मिळणार आहे. व्यवसायाशी संबंधित लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला व्यवसायात चांगला नफा लाभणार आहे. बाजारात अडकलेला पैसाही अनपेक्षितपणे बाहेर येणार असून बँक बॅलेन्स वाढणार आहे. जमीन, इमारत किंवा वाहन खरेदीचे योग आहेत. नोकरदार महिलांसाठी हा आठवडा खूप भाग्यवान असणार आहे. नोकरीतील प्रगतीमुळे केवळ कामाच्या ठिकाणीच नव्हे तर कुटुंबातही सन्मान वाढणार आहे. याआधी एखाद्या योजनेत गुंतवलेल्या पैशाचे फायदे तुम्हाला मिळणार आहे. प्रेम जीवनात आनंद आणि वैवाहिक जीवन आनंदी असणार आहे. आरोग्य सामान्य असणार आहे. 
शुभ दिवस: 4,6


कर्क (Cancer Zodiac)  


या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ ठरणार आहे. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या करिअर आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळणार आहे. तुम्ही तुमच्या प्रमोशनची किंवा तुमच्या इच्छित ठिकाणी स्थानांतरित होण्याची वेळ आली आहे. या आठवड्यात तुम्हाला सहकारी, जवळचे मित्र आणि कुटुंबीय यांचे पूर्ण सहकार्य मिळणार आहे. तुम्ही ज्या क्षेत्रात प्रयत्न कराल त्या क्षेत्रात तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार यश मिळणार आहे. नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत वाढणार आहे. आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्हाला अचानक कुठूनतरी आर्थिक लाभ होणार आहे. जमीन आणि इमारतींच्या खरेदी-विक्रीच्या मनोकामना पूर्ण होणार आहे. लव्ह लाइफ मजबूत होणार आहे. तुम्हाला तुमच्या लव्ह पार्टनरसोबत चांगले ट्युनिंग असणार आहे. कुटुंब तुमच्या प्रेमाचा स्विकारणार आहे. जोडीदारासोबत आनंददायी क्षण घालवणार आहात. 
शुभ दिवस: 3,4,6


सिंह (Leo Zodiac)


या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा त्यांच्या मनोकामना पूर्ण करणारा ठरणार आहे. करिअरशी संबंधित प्रवास घडणार आहे. प्रवास सुखकर होणार असून इच्छित परिणाम मिळणार आहे. तुम्हाला चांगली नोकरीची संधी मिळणार आहे. नोकरीत बदलाची इच्छाही पूर्ण होणार आहे. कर्म आणि नशीब यांच्यातील चांगल्या समन्वयामुळे, करिअर किंवा व्यवसायात यश मिळणार आहे. बचत केलेल्या पैशांमध्ये वाढ होणार असून आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. या आठवड्यात तुम्ही सामाजिक आणि धार्मिक कार्यात सहभागी होणार आहे. या काळात तीर्थक्षेत्राची यात्राही घडू शकतात. आरोग्याच्या दृष्टीकोनातून हा आठवडा सामान्य असणार आहे. प्रेम जीवनात निर्माण झालेले गैरसमज दूर होणार आहे. 
शुभ दिवस: 3,5,7


कन्या (Virgo Zodiac) 


हा आठवडा तुमच्यासाठी चढ-उतारांचा असणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला महत्त्वाची कामं पूर्ण करण्यासाठी थोडी घाई करावी लागणार आहे. कामाच्या ठिकाणी अतिरिक्त कामाच्या ओझ्यामुळे, तुम्हाला ते सोडवण्यासाठी अतिरिक्त मेहनत आणि प्रयत्न करण्याशिवाय पर्याय नसेल. नोकरदार महिलांना काम आणि घराचा समतोल साधण्यात काही अडचणी येणार आहे. व्यवसायात गुंतलेल्या लोकांना प्रतिस्पर्ध्यांकडून कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागणार आहे. व्यवसाय विस्ताराच्या योजनांमध्ये काही अडथळे येणार आहेत. जर तुम्ही परदेशात करिअर आणि बिझनेससाठी प्रयत्न करत असाल तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे. सप्ताहाच्या उत्तरार्धात कौटुंबिक वादामुळे तणाव असणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवाव लागणार आहे. लव्ह लाइफमध्ये सावधगिरीने पुढे जा. 
शुभ दिवस: 3,4


तूळ (Libra Zodiac)  


या राशीच्या लोकांना जवळच्या लाभाऐवजी दूरचे नुकसान टाळावे लागणार आहे. या आठवड्यात तुम्हाला मिळणारा नफा तोट्यात बदलू नये याची खात्री करण्यासाठी तुम्हाला तुमच्या बुद्धिमत्तेचा आणि विवेकाचा पुरेपूर वापर करावा लागणार आहे. या आठवड्यात करिअर आणि व्यवसायाशी संबंधित कोणताही निर्णय घाईने आणि कोणत्या प्रभावाखाली घेऊ नका. कोणत्याही धोकादायक योजनेत गुंतवणूक करणे टाळा. या काळात तुमचे मन धर्म आणि अध्यात्मात अधिक व्यस्त असणार आहे. जवळच्या मित्रांसोबत किंवा कुटुंबियांसोबत तीर्थयात्रेला जाण्याचा योग आहेत. लव्ह लाईफच्या दृष्टीने हा आठवडा सामान्य असणार आहे. तर वैवाहिक जीवनात आनंद असेल. 
शुभ दिवस: 3,4,6,7


वृश्चिक (Scorpio Zodiac)   


या लोकांसाठी शुभ असणार आहे. या आठवड्यात, एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने, तुम्ही एखाद्या मोठ्या समस्येवर उपाय शोधण्यात यशस्वी होणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास तुम्हाला यश प्राप्त होईल. नोकरदार लोकांनी कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांसोबत एकत्र काम करणे योग्य होईल. एखादा मोठा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मित्र खूप उपयुक्त ठरणार आहे. या काळात तुम्ही काही नवीन करणार असाल तर संबंधित क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींचा सल्ला नक्की घ्या. तुमचे प्रेम जीवन मजबूत होणार आहे. तुमच्या प्रेम जोडीदाराच्या वैयक्तिक जीवनात अनावश्यक हस्तक्षेप करणे टाळा. वैवाहिक जीवन आनंदी असणार आहे. 
शुभ दिवस: 3,4,5


धनु (Sagittarius Zodiac)


जूनचा पहिला आठवडा या लोकांसाठी खूप शुभ ठरणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीपासून, तुमची नियोजित कामे पूर्ण होताना दिसत असल्याने तुम्ही आश्चर्यकारक उत्साह आणि ऊर्जा पाहिला मिळणार आहे. या काळात तुम्ही सर्व काम गांभीर्याने करण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला शुभ परिणाम मिळणार आहे. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला करिअर आणि बिझनेसच्या संदर्भात थोडी जास्त घाई करावी लागणार आहे. कामामुळे तुम्ही व्यस्त असणार आहात. आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्ही प्रभावशाली लोकांच्या संपर्कात येणार आहे. ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होणार आहे. जुनाट आजारामुळे आरोग्याशी संबंधित काही समस्यांना होऊ शकतात. या काळात तुमच्या खाण्याच्या सवयींची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. प्रेमसंबंध दृढ होणार आहे. जोडीदारासोबत चांगला समन्वय असणार आहे. 
शुभ दिवस: 3,6


मकर (Capricorn Zodiac)  


या राशीच्या लोकांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात भावना किंवा गोंधळामुळे कोणताही निर्णय घेणे टाळा. कामाच्या ठिकाणी काम दुसऱ्याच्या हातात सोडण्याची चूक करु नका. तुमचे काम अधिक चांगले करण्यासाठी, घरचा ताण ऑफिसला आणि ऑफिसचा ताण घरापर्यंत नेउ नका. आठवड्याच्या मध्यात आरोग्याशी संबंधित समस्या शारीरिक आणि मानसिक त्रासाचे ठरणार आहे. या काळात आपल्या आहाराची आणि दैनंदिन दिनचर्येची काळजी घ्या .काही घरगुती समस्यांमुळे चिंतेत राहाल. वडिलोपार्जित संपत्तीबाबत वाद होण्याची शक्यता आहे. या काळात अत्यंत हुशारीने आणि जबाबदारीने पावले उचलावी लागणार आहे. व्यवसायात किंवा कोणत्याही योजनेत हुशारीने पैसे गुंतवा. लव्ह लाईफ सामान्य असणार आहे. जीवनातील कठीण काळात तुमचा जोडीदार तुमचा आधार बनणार आहे. 
शुभ दिवस: 4,6,7


कुंभ (Aquarius Zodiac) 


जूनचा पहिला आठवडा कुंभ राशीच्या लोकांसाठी खूप शुभ असणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला करिअर आणि व्यवसायाशी संबंधित काही चांगली बातमी कानावर पडणार आहे. ज्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असणार आहे. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला बढती मिळणार आहे. तर व्यवसायिकांना आर्थिक फायदा होणार आहे. बाजारात अडकलेला पैसा अनपेक्षितपणे तुम्हाला मिळणार आहे. या आठवड्यात बाजारातील तेजीचा फायदा तुम्हाला होणार आहे. सप्ताहाच्या शेवटी तुम्हाला जमीन किंवा मालमत्तेची खरेदी-विक्री किंवा वडिलोपार्जित मालमत्ता मिळवून मोठे लाभ मिळणार आहे. तुमच्या मुलांच्या कर्तृत्वामुळे तुमचा आदर आणि सन्मान वाढणार आहे. आरोग्य सामान्य असणार आहे. वैवाहिक जीवन आनंदी असणार आहे. कुटुंबासोबत आनंदात वेळ व्यतित करणार आहे. 
शुभ दिवस: 5,7


मीन (Pisces Zodiac) 


या राशीच्या लोकांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी शॉर्टकटचा अवलंब करु नका. अन्यथा केलेले काम देखील बिघडणार आहे. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला आरोग्याशी संबंधित काही समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. तुम्हाला जुनाट आजारांपासून स्वतःचे संरक्षण करावे लागणार आहे. अन्यथा तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जावं लागू शकतं. जर तुम्ही व्यवसायात गुंतलेले असाल तर आठवड्याचा दुसरा भाग तुमच्यासाठी पहिल्या सहामाहीपेक्षा अधिक शुभ असणार आहे. लव्ह लाईफ मधुर ठेवण्यासाठी तुमच्या लव्ह पार्टनरच्या भावनांकडे दुर्लक्ष करु नका. तुमच्या जोडीदारासोबत एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देणार आहात. 
शुभ दिवस: 5,6,7


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)