Weekly Love Horoscope : सूर्य आणि शनिसोबत बुधाचा त्रिग्रही योग, `या` राशींच्या लव्ह लाइफमध्ये भरपूर रोमान्स
Weekly Love Rashifal 27 February to 5 March 2023 : अवकाशात होणारे ग्रहांचे बदल हे आपल्या आयुष्यावर परिणाम करतात. आपली आर्थिक स्थितीपासून आपल्या लव्ह लाइफवर याचा प्रभाव दिसतो. त्यामुळे येणारा पुढच्या आठवड्यात आपलं लव्ह लाइफ कसं असेल ते जाणून घेऊयात.
Weekly Love Horoscope 27 February to 5 March 2023 in marathi : इथे पुढच्या क्षणाला काय होणार हे कोणी सांगू शकत नाही. पण ज्योतिषशास्त्र तुम्हाला मदत करते साधारण तुमचा येणारा आठवडा कसा असेल हे सांगतात. या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 27 February ला बुध कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे बुध, सूर्य आणि शनि असा त्रिग्रही योग होणार आहे. त्यानंतर 1 मार्चला तो अस्त होणार आहे. या त्रिग्रही योगामुळे काही राशीच्या लोकांच्या आयुष्यात रोमान्समय असणार आहे. (weekly love rashifal 27 February to 5 March 2023 weekly love horoscope all zodiac signs in marathi)
मेष (Aries)
हा आठवड्या या राशीच्या लोकांसाठी परस्पर प्रेम निर्माण करणारा आणि रोमँटिक असणार आहे. या आठवड्यात तुम्ही जुन्या आठवणींना उजाळा द्याल. हा आठवडा खूप खास असणार आहे. कारण तुमचा जोडीदार तुमच्याकडे खूप लक्ष देणार आहात.
वृषभ (Taurus)
हा आठवडा या राशीच्या लोकांसाठी जरा त्रासदायक ठरणार आहे. जोडीदारांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. तुमच्या धाडसी निर्णयामुळे तुमचं नातं खराब होऊ शकतं. एकमेकांशी बोलून समस्या सोडवू शकाल.
मिथुन (Gemini)
हा आठवडा तुमच्या आणि तुमच्या जोडीदारासाठी कठीण असणार आहे. तुमच्या नात्यामध्ये इतरांना हस्तक्षेप करु देऊ नका. जर वेळीच या गोष्टीला आळा घातला नाही तर तुमच्या नात्यात तणाव वाढेल. तुमच्या नातं आणि त्यातील अडचणी तुम्ही सोडवा. आठवड्याचा शेवट तुमच्यासाठी आनंद घेऊन येईल.
कर्क (Cancer)
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा रोमान्समय असणार आहे. जोडप्यांमध्ये प्रेम आणि आनंद असणार आहे. मात्र कुठल्या तरी घटनेमुळं तुमचं मन अस्वस्थ राहिल. पण आठवड्याचा शेवटी होणाऱ्या पार्टीमुळे तुमचा मूड आनंदी राहणार आहे.
सिंह (Leo)
या राशीच्या लोकांसाठी त्यांची लव्ह लाइफ खास चांगली नसणार. हा आठवडा जोडप्यांनी काळजीपूर्वक वागण्याची गरज आहे. परस्पर संवादातून नात्यामधील समस्या सोडवणे गरजेचं आहे. अन्यथा हा आठवडा लव्ह लाइफसाठी त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे.
कन्या (Virgo)
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आनंददायी आणि रोमान्सने भरलेला राहणार आहे. जोडप्यामधील परस्पर प्रेम वाढणार आहे. हा आठवडा तुमच्यासाठी खूप खास ठरणार आहे. विश्वास, प्रेम आणि सुसंवाद यामुळे तुमचं नात मजबूत होणार आहे.
तूळ (Libra)
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ असणार आहे. त्यांचा लव्ह लाइफसाठी हा आठवडा खास छान असणार आहे. परस्पर प्रे वाढणार आहे आणि त्यामुळे लव्ह लाइफमध्ये मन प्रसन्न राहणार आहे. या आठवड्यात रोमान्स आणि आनंद असणार आहे. या आठवड्यात लव्ह लाइफबद्दल संबंधित गूड न्यूज मिळणार आहे. आठवड्याचा शेवटी पाटर्नरसोबत खरेदी करण्यास जाणार आहात.
वृश्चिक (Scorpio)
या राशीच्या लोकांनी लव्ह लाइफबद्दल जरा काळजी घ्या. तसा तर हा आठवडा तुमच्यासाठी आनंददायी आहे. पण पाटर्नरमध्ये काही गैरसमज होण्याची शक्यता आहे. नात्यामध्ये गोडवा राहावा असं तुम्हाला वाटतं असेल तर जिभेवर नियंत्रण ठेवा. नाही तर मन दुखविण्याची शक्यता आहे.
धनु (Sagittarius)
हा आठवड्या तुमच्या लव्ह लाइफसाठी शुभ असणार आहे. तुमचं प्रेमसंबंध मजबूत होईल. त्यामुळे हा आठवड्यात रोमान्समुळे तुमच्या आयुष्यात आनंद आनंदच असणार आहे. फक्त या आठवड्यात जरा संयमाने पुढे जा. नाही तर आयुष्यात अडचणी येऊ शकतात.
मकर (Capricorn)
या राशीच्या लोकांसाठी हा आवठडा रोमँटिक असणार आहे. तुमचं प्रेमाचं नातं घट्ट होईल. वडिलांच्या आशिर्वादाने तुमचं नात्यात गोडवा वाढेल. लव्ह लाइफमध्ये आतापर्यंत जो काही संघर्ष तुम्ही सहन केला आहे. या आठवड्यात तो आनंदात बदलणार आहे. सग्नल लोकांच्या आयुष्यात प्रेम येणार आहे.
कुंभ (Aquarius)
या राशीच्या लोकांनी या आठवड्यात जरा काळजीपूर्वक राहणे गरजेचं आहे. आयुष्यात त्रास होऊ शकतात. प्रवासावरुन वाद होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी नातेसंबंध सुधारतील पण तरीही मन उदास राहिल.
मीन (Pisces)
या राशीच्या लोकांचे लव्ह लाइफ आनंदी असणार आहे. सुख समृद्धीचे शुभ योग आणि परस्पर प्रेम अधिक मजबूर होणार आहे. या आठवड्यात तुमच्या प्रेमाची नवीन सुरुवात होणार आहे. आठवड्याच्या शेवटी जरा एखाद्या गोष्टीवरून नात्यात तणाव वाढू शकतो. पण विश्वास आणि संवाद यातून जीवनात आनंद परत येईल.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)