Weekly Tarot Horoscope : गजकेसरी राजयोगामुळे `या` लोकांना लॉटरी, जाणून घ्या साप्ताहिक टॅरो राशीभविष्य
Weekly Tarot Horoscope Prediction 29 July to 4 August 2024 in Marathi : ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात गजकेसरी राजयोग निर्माण होणार आहे. या आठवड्यात गुरू आणि चंद्र वृषभ राशीमध्ये एकत्र असल्याने टॅरो कार्डची गणना वृषभ राशीसह 4 राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. त्यांना पदोन्नती आणि आर्थिक लाभ होईल. चला जाणून घेऊया मेष ते मीन राशीपर्यंतच्या सर्व राशींसाठी आठवडा कसा राहील.
Weekly Tarot Horoscope Prediction 29 July to 4 August 2024 in Marathi : गजकेसरी राजयोग ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात निर्माण होणार आहे. या योगाच्या प्रभावामुळे टॅरो कार्डनुसार 4 राशीच्या लोकांसाठी ऑगस्टचा पहिला आठवडा शुभ ठरणार आहे. मेष ते मीन राशीच्या सर्व राशींसाठी टॅरो कार्डनुसार ऑगस्टचा पहिला आठवडा कसा असेल जाणून घ्या टॅरो कार्ड रीडर डॉ. कविता ओझा यांच्याकडून (weekly tarot horoscope prediction tarot card reading 29 July to 4 August 2024 saptahik rashi bhavishya in marathi)
मेष (Aries Zodiac)
टॅरो कार्ड्सची गणना असं दर्शवतं की या राशीच्या लोकांनी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात खूप सावधगिरी राहवं लागणार आहे. या आठवड्यात कोणत्याही प्रवासाला निघण्यापूर्वी आपल्या देवतेचे स्मरण नक्की करा. या आठवड्यात अटकळांवर जास्त लक्ष देऊ नका. जोखमीची कामंही या आठवड्यात करु नका. कार्यक्षेत्रात जे अडथळे येत होते ते आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे सोमवारी दूर होणार आहेत.
वृषभ (Taurus Zodiac)
टॅरो कार्डनुसार या राशीच्या लोकांसाठी ऑगस्टचा पहिला आठवडा उत्साहाचा असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला व्यवसायात नवीन यश आणि प्रगती साधता येणार आहे. एवढंच नाही तर तुमचे प्रलंबित काम पूर्ण होणार आहे. या आठवड्यात तुमच्या जुन्या सवयी सोडा, तरच फायदा मिळेल. या आठवड्यात नोकरीच्या ठिकाणी उच्च अधिकारी तुमच्या क्षमतेची किंवा प्रतिभेची परीक्षा घेणार आहेत.
मिथुन (Gemini Zodiac)
टॅरो कार्डची गणना दर्शवते की यान राशीच्या लोकांना नवीन आठवड्यात स्पर्धेत यश मिळणार आहे. साहित्य आणि संगीताची आवड असलेल्यांना अधिक फायदा होणार आहे. मालमत्ता, घर आणि कौटुंबिक बाबतीत तुम्ही नवीन सुरुवात करणार आहात. प्रलंबित कामं पूर्ण होण्यास आणखी काही कालावधी लागण्याची शक्यता आहे.
कर्क (Cancer Zodiac)
टॅरो कार्डनुसार हा नवीन आठवडा तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. या आठवड्यात संशोधनाशी संबंधित कामांना आपले प्राधान्य द्याव लागणार आहे. तुम्ही थोडे महत्वाकांक्षी देखील असणार आहात. एवढंच नाही तर तुमची आर्थिक बाजू थोडी मजबूत करणार आहात. नवीन खरेदी करायची असेल तर त्यासाठी वेळ अनुकूल असणार आहे. तुमच्या लोकांसोबत नवीन फायदेशीर संबंधही निर्माण होणार आहे.
सिंह (Leo Zodiac)
टॅरो कार्डनुसार या आठवड्यात तुमच्या ग्रहांची स्थिती अनुकूल वाटत नाही आहे. या आठवड्यात तुमचे जीवन साथीदारासोबत काही मुद्द्यावर मतभेद होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत जास्तीत जास्त वेळ घालवणार आहात. एवढंच नाही तर पती-पत्नी एकमेकांसोबत थोडा वेळ घालवण्याचा प्रयत्न केल्यास फायदा मिळेल. मात्र, या आठवड्यात तुम्ही तुमची ऊर्जा विखुरलेल्या गोष्टींची पुनर्रचना करण्यावर केंद्रित करणार आहात.
कन्या (Virgo Zodiac)
नवीन आठवड्यात कन्या राशीच्या लोकांचे वर्तन खूपच आक्रमक असणार आहे. या व्यतिरिक्त तुमचे वैवाहिक जीवन देखील या आठवड्यात काहीसे आंबट आणि थोडे गोड असणार आहे. विद्यार्थ्यांना खूप मेहनत करावी लागणार आहे. तरच तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळणार आहे. गुरुवारी, नातेसंबंध, संधी आणि विरोध एकाच वेळी तुमच्या आयुष्यात प्रवेश करणार आहेत.
तूळ (Libra Zodiac)
टॅरो कार्ड्सनुसार उपजीविकेच्या क्षेत्रात काम करणारे लोक त्यांच्या सहकाऱ्यांशी समन्वय साधणे गरजेचे असणार आहे. त्याशिवाय, आठवड्याच्या शेवटी तुम्हाला निराशेचा सामना करावा लागणार आहे. मात्र तुमच्या अनुभवातून माहिती मिळवण्यात तुम्ही यशस्वी होणार आहात. जो या आठवड्यात तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे.
वृश्चिक (Scorpio Zodiac)
या आठवड्यात वृश्चिक राशीच्या लोकांचे लक्ष आणि काम आरोग्यावर असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळणार आहे. त्यांच्या पाठिंब्याने तुमच्या आयुष्यात खूप आनंद असणार आहे. तसंच, तुम्हाला आर्थिक बाबतीत थोडे सावध राहवं लागणार आहे. पैशाचा अपव्यय टाळा आणि जोडीदाराच्या भावनांचा आदर करणे तुम्हाला हिताच ठरेल.
धनु (Sagittarius Zodiac)
टॅरो कार्ड्सची गणना दर्शवते की, या लोकांसाठी प्रभाव, करिष्मा आणि सर्जनशील प्रवृत्ती या आठवड्यात त्यांच्या शिखरावर येणार आहे. तुम्ही त्यांचा पुरेपूर फायदा घेणार आहात. विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक रस असणार आहे. तुमचे प्रेमसंबंधही घट्ट होणार आहे. तुम्हाला व्यवसायात नफा आणि प्रगतीची संधी मिळणार आहे. या आठवड्यात तुम्ही विजयी मार्गात असणार आहात.
मकर (Capricorn Zodiac)
टॅरो कार्ड्स गणनेनुसार या राशीच्या लोकांच्या जीवनात प्रगतीचे नवीन मार्ग उघडणार आहेत. तुम्ही सध्या जे काही करत आहात ते भविष्यात फायदेशीर ठरणार आहे. तुमच्या जोडीदाराच्या तब्येतीची काळजी या आठवड्यात घ्या. त्याला तुमची गरज भासणार आहे.
कुंभ (Aquarius Zodiac)
कुंभ राशीच्या लोकांनी या आठवड्यात सहलीला जाण्यापूर्वी घरामध्ये योग्य व्यवस्था करणे गरजेचे आहे. या आठवड्यात तुमचा तुमच्या कुटुंबातील कोणाशी वाद होण्याची शक्यता आहे. प्रेम व्यक्त करण्यात घाई करू नका. तुम्ही ज्या भावनांना प्रेम समजता त्या फक्त आकर्षण असण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती समाधानकारक असणार आहे.
मीन (Pisces Zodiac)
टॅरो कार्डनुसार या राशीच्या लोकांची मुलांबद्दलची आवड वाढणार आहे. व्यवसायात नवीन सौदेही होणार आहेत. कायदेशीर बाबींमध्ये निष्काळजी राहू नका. प्रयत्न आणि सहकार्यामुळे अनुकूलता प्राप्त होणार आहे. नवीन संबंध फायदेशीर ठरणार आहे. आर्थिक योजना राबवल्या जाणार आहेत. नवीन काम मिळण्याची शक्यता असून वाहनामुळे इजा होऊ शकते.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती टॅरो कार्डवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)