Weekly Tarot Horoscope : `या` लोकांनी वाहन चालवताना सावधगिरी बाळगा! टॅरो कार्ड्सवरून काय आहे तुमच्या नशिबात?
Weekly Tarot Horoscope Prediction 18 To 24 march 2024 in Marathi : मार्च महिन्याचा हा तिसरा आठवड्यात शनिदेवाचा उदय होणार आहे. तर बृहस्पति भरणी नक्षत्राच्या तिसऱ्या चरणात संक्रमण करणार आहे. त्यामुळे अनेक राशींना सावध राहण्याची आवश्यकता आहे. टॅरो कार्ड्सवरून जाणून घ्या तुमच्या नशिबात या आठवड्यात काय आहे ते.
Weekly Tarot Horoscope Prediction 18 To 24 march 2024 in Marathi : मार्च महिन्याचा आठवडा ग्रहण आणि नक्षत्रच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्त्वाचा असणार आहे. या आठवड्यात कुंभ राशीत शनि उदय होणार आहे. त्यात भरणी नक्षत्राच्या तिसऱ्या चरणात गुरुचे संक्रमण होईल. त्यामुळे टॅरो कार्ड्सनुसार गणितानुसार हा आठवडा काही राशींना खूप काळजी घ्यावी लागणार आहे. जाणून घ्या मेष ते मीन राशीपर्यंतच्या लोकांसाठी हा आठवडा कसा असणार आहे. (Weekly Tarot Horoscope Prediction Tarot Card Reading For 18 To 24 march 2024 Saptahik Rashi Bhavishya in Marathi)
मेष (Aries Zodiac)
टॅरो कार्ड्सच्या गणितानुसार या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सकारात्मक असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला अनेक गोष्टीमुळे आराम मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होणार आहे. आरोग्याच्या समस्या जाणवणार असून त्याकडे दुर्लक्ष करु नका. मात्र तुमच्या कुटुंबातील वातावरण आनंनदायी असणार आहे.
वृषभ (Taurus Zodiac)
टॅरो कार्ड्सच्या गणितानुसार हा आठवडा तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. तुम्ही अनेक वस्तूंची खरेदी करणार आहात. तुम्हाला अनेक नवीन लोक भेटणार आहे. या भेटीचा फायदा भविष्यात होणार आहे. या आठवड्यात आरामात काम करा. अभ्यासासाठी वेळ खूप चांगला असणार आहे. यासोबतच तुमच्या शिक्षणात येणाऱ्या अडथळ्यांपासूनही तुम्हाला मुक्ती मिळणार आहे.
मिथुन (Gemini Zodiac)
टॅरो कार्ड्सच्या गणितानुसार या आठवड्यात मिथुन राशीच्या लोकांच्या कामात अडथळा निर्माण होणार आहे. तुम्हाला सध्या रिअल इस्टेटबाबत निर्णय घेऊ नका, अन्यथा तुम्हाला मोठा नुकसान सहन सहन कराव लागेल. या आठवड्यात बाहेर जाणार असाल तर घराची सुरक्षितेची काळजी घ्या. कुटुंबात वाद होण्याची शक्यता आहे.
कर्क (Cancer Zodiac)
टॅरो कार्ड्सचे गणित पाहता हा आठवडा तुमच्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगला असणार आहे. तुमच्या चतुर्थ गुरूच्या उपस्थितीने तुम्हाला जमीन आणि वाहन खरेदीचे सुख मिळणार आहे. आठव्या भावात शनि असल्यामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी खूप मेहनत करावी लागणार आहे. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या खर्चातही दुप्पटीने वाढ होणार आहे.
सिंह (Leo Zodiac)
टॅरो कार्ड्सच्या गणितात असं दिसतंय की, या राशीच्या लोकांना हा आठवडा संमिश्र असणार आहे. या लोकांनी त्यांच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. तुम्ही नवीन नात्याला सुरुवात करणार असाल तर हा योग्य काळ नाही. तर नोकरदार लोकांना त्यांच्या इच्छेनुसार बढती मिळणार आहे. एवढंच नाही तर तुमच्या पैशांत वाढ होणार आहे. तुमच्या अनुभवांचा फायदा होणार आहे.
कन्या (Virgo Zodiac)
टॅरो कार्डचे गणित म्हणतं की, कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा फायदेशीर ठरणार आहे. तुम्हाला एक चांगली संधी मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला विशेष लाभ होणार आहे. या आठवड्यात तुम्ही प्रियजनांच्या संपर्कात राहल्यास फायदा होईल. कौटुंबिक जीवनात आनंद, जवळीक आणि परस्पर सहकार्य वाढणार आहे.
तूळ (Libra Zodiac)
टॅरो कार्ड्सचे गणित तूळ राशीसाठी चांगले परिणाम दाखवत आहे. या आठवड्यात तुमचे सर्व रखडलेले कामं मार्गी लागणार आहेत. कामाच्या ठिकाणनी येणारे समस्याही सहज दूर होणार आहे. गुढीपाडवानिमित्ताने जुन्या गोष्टी आणि सवयी सोडून द्या.
वृश्चिक (Scorpio Zodiac)
टॅरो कार्ड्सची गणना असं सांगतेय की, या आठवड्यात तुमच्यावर कामाचा ताण असणार आहे. एवढंच नाही तर आरोग्याच्या समस्या उद्भवणार आहे. त्याशिवाय या आठवड्यात लांबचा प्रवास न केलेला बरं होईल. नाहीतर तुमचं आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. तुमचं मन एखाद्या गोष्टीमउेल चिंताग्रस्त असणार आहे. तरदुसरीकडे कुटुंबात आनंदी वातावरणही असणार आहे.
धनु (Sagittarius Zodiac)
टॅरो कार्ड्सच्या गणितानुसार हा आठवडा धनु राशीच्या लोकांसाठी अनुकूल असणार आहे. तर नवीन नाती तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. या आठवड्यात आर्थिक बाबतीत गणितांवर लक्ष द्या. नवीन काम तुम्हाला मिळणार आहे. वाहन चालवताना थोडं सावधगिरीने राहा. नाही तर अपघाताची शक्यता आहे.
मकर (Capricorn Zodiac)
टॅरो कार्ड्सची गणना असं सांगते की, मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा फायदेशीर ठरणार आहे. आठव्या भावात सूर्य गोचरामुळे आत्मविश्वासाची कमतरता तुम्हाला जाणवणार आहे. आरोग्याबद्दलही काही समस्या निर्माण होणार आहे. त्यामुळे विशेष काळजी घ्या अन्यथा हॉस्पिटलच्या पायऱ्या चढाव लागेल. सूर्य नमस्कार तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
कुंभ (Aquarius Zodiac)
टॅरो कार्ड्सचे गणित असं सांगत आहे की, या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यावसायिकांसाठी खूप चांगला असणार आहे. नवीन प्रकल्प सुरू करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. तुमच्याकडे पैशाचा सहज प्रवाह वाढणार आहे. अनियमित आरोग्याची समस्या तुम्हाला त्रासदायक ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी अडथळे येणार आहेत. तुम्ही ठरवलेली कामंही मार्गी लागणार नाहीत.
मीन (Pisces Zodiac)
टॅरो कार्ड्सचे गणित असं सांगत आहेत की, मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला असणार आहे. कामाच्या ठिकाणी सहकारी तुम्हाला आकर्षित करण्यात यशस्वी होणार आहेत. कामाच्या ठिकाणी मिळालेली संधीचं तुम्ही सोनं करणार आहात. मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका. आर्थिक बाबतीतही दुर्लक्ष करणे तुम्हाला महागात पडू शकतं. गुरुवारचा उपवास तुम्हाला फायदेशीर ठरेल.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)