Weekly Tarot Horoscope Prediction 29 april to 5 may 2024 in Marathi : मे महिन्याचा पहिला आठवड्यात बुध आणि शुक्रचा गोचरमुळे लक्ष्मी नारायण योग निर्माण होणार आहे. या योगामुळे अनेकांना फायदा होणार आहे. पण काही राशींसाठी हा आठवडा संकटांचा असणार आहे. जाणून घ्या तुमचं साप्ताहिक राशीभविष्य टॅरो कार्ड रीडर डॉ. कविता ओझा यांच्याकडून 


मेष (Aries Zodiac)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टॅरो कार्ड्सनुसार मे महिन्याचा पहिला आठवडा या राशीच्या लोकांसाठी लाभदायक असणार आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. त्यामुळे तुम्ही समाधानी असणार आहात. आरोग्यही चांगल असणार असून कुटुंबात आनंदी वातावरण असेल. 


वृषभ (Taurus Zodiac) 


या राशीच्या लोकांच्या कुटुंबात वादळ येण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत मतभेद होणार आहेत. संवादातून गैरसमज दूर होऊन नातं पुन्हा नव्याने सुरु करणे तुमच्या हिताचं ठरेल. आरोग्याकडे वेळीच लक्ष द्या. 


मिथुन (Gemini Zodiac)


या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप भारी असणर आहे. हा आठवडा तुमच्यासाठी विजयी रथ घेऊन आला आहे. या आठवड्यातील प्रगती भविष्यात तुमच्यासाठी भाग्यशाली ठरणार आहे. मात्र जोडीदाराच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. 


कर्क (Cancer Zodiac)   


या राशीच्या लोकांच्या व्यक्तिमत्त्वात तेज वाढणार आहे. देश-विदेशात प्रसिद्धी वाढवण्यासोबतच तुम्हाला एखादा पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत मनोरंजनाच्या सहली आणि परदेशी सहलीला जाण्याचा बेत आखणार आहात. 


सिंह (Leo Zodiac) 


या राशीच्या लोकांची या आठवड्यात आर्थिक स्थिती कमजोर असणार आहे. तुमचे प्रयत्नही या आठवड्यात व्यर्थ जाणार आहे. सामाजिक आणि धार्मिक कार्यातही पैसा खर्च होणार आहे. 


कन्या (Virgo Zodiac)    


या राशीच्या लोकांसाठी मे महिन्याचा पहिला आठवडा कार्यक्षेत्रात प्रगती आणि सन्मान घेऊन येणार आहे. कुटुंबात आनंद आणि व्यावसायात प्रगती यामुळे तुम्ही आनंद असणार आहात. कुटुंब आणि मित्रांसोबत आनंदी क्षण व्यतित करणार आहात. 


तूळ (Libra Zodiac)  


या राशीच्या लोकांचा प्रभाव, करिष्मा आणि सर्जनशील प्रवृत्ती यांना उंच शिखरावर घेऊन जाणार आहे. आध्यात्मिक प्रगती तुमच्यामध्ये सकारात्मक बदल घडविणार आहे. व्यवसायात लाभ आणि प्रगतीच्या संधी मिळणार असल्याने तुम्ही आनंदी असणार आहात. 


वृश्चिक (Scorpio Zodiac)   


मे महिन्याचा पहिला आठवडा या राशीच्या लोकांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. या आठवड्यात तुम्ही मालमत्ता, घर आणि कौटुंबिक बाबतीत नवीन सुरुवात करणार आहात. तसंच या आठवड्यात तुम्हाला आर्थिक लाभही होणार आहे. तुम्हाला गुंतवणुकीद्वारे नफा मिळणार आहे. पण, गुंतवणुकीशी संबंधित निर्णय संयमाने आणि समजून घेणं गरजेचं आहे. 


धनु (Sagittarius Zodiac) 


या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा थोडा कठीण असणार आहे. तुम्हाला सावध राहावं लागणार असून खास करुन आर्थिक व्यवहार करताना डोळे आणि डोकं उघडे ठेवा. खर्चाचा बोझा वाढणार आहे. तुमच्या जोडीदाराच्या भावनांचा आदर करणे तुमच्या हिताच ठरणार आहे. 


मकर (Capricorn Zodiac)  


या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा थोडी काळजीचा असणार आहे. तुम्हाला कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागण्याची शक्यता आहे. तसंच आरोग्यासाठीही लक्ष द्या अन्यथा समस्या वाढतील. दुसरीकडे आर्थिक स्थिती सुधारणार आहे. 


कुंभ (Aquarius Zodiac) 


या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कुटुंबात तणावाचा असणार आहे. विवाहित लोकांना त्यांच्या सासरच्या लोकांकडून काही विषयांवर तणावाला सामोरे जावं लागणार आहे. आरोग्याची समस्या डोकेदुखी ठरणार आहे. 


मीन  (Pisces Zodiac)  


मीन राशीच्या लोकांना हा आठवडा चांगला असणार आहे. व्यवसाय मालक आणि उद्योजकांसाठी हा आठवडा लाभदायक असेल. जोखीम पत्करण्याचा प्रयत्न करताना सावध राहा.  


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती टॅरो कार्डवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)