Weekly Tarot Horoscope Prediction 6 to 12 may 2024 in Marathi : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मे महिन्याच्या या आठवड्यात गुरु वृषभ राशीत अस्त होणार आहे. तर बुध ग्रह हा मेष राशीत गोचर करणार आहे. टॅरो कार्डचं गणितानुसार हा आठवडा काही राशींसाठी आर्थिक लाभाचा ठरणार आहे. चला मग जाणून घ्या तुमचं साप्ताहिक राशीभविष्य टॅरो कार्ड रीडर डॉ. कविता ओझा यांच्याकडून (weekly tarot horoscope prediction tarot card reading for 6 to 12 may 2024 saptahik rashi bhavishya in marathi) 


मेष (Aries Zodiac)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र जाणार आहे. यांच्या कामात थोडा उशीर होणार आहे. तर या लोकांना थोडं प्रॅक्टिकल होण्याची गरज आहे. या लोकांच्या आरोग्यात सुधारणा होणार असून यांना आर्थिक फायदाही होणार आहे. काही गोष्टींबाबतीत तडजोड करणेचे फायद्याच ठरेल. काही गोष्टी समजून घ्या आणि त्यानंतर वागा. 


वृषभ (Taurus Zodiac) 


मे महिन्याचा हा आठवडा तुमच्यासाठी कठीण असणार आहे. तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे या आठवड्यात गंभीर विषयांवर खास करुन कुटुंबातील सदस्यांसोबत चर्चा करणं टाळा. कारण नात्यामध्ये कटुतेचे वातावरण येऊ शकतं. कार्यक्षेत्रात प्रतिकूल परिस्थितीचाही सामना करावा लागणार आहे. आठवड्याच्या शेवटी जरा वातावरण सकारात्मक असेल. तुम्हाला जरा बरं वाटले. 


मिथुन (Gemini Zodiac)


या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा जरा दुःखाचा असू शकतो. या आठवड्यात तुम्ही फार काही करु शकणार नाहीत. तुम्हाला टीकाकार आणि हितंचितकांच्या विरोधाचा सामना करावा लागणार आहे. तुमच्या वाणीवर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवा. 


कर्क (Cancer Zodiac)   


हा आठवडा कर्क राशीच्या लोकांच्या नातेसंबंधात तणाव निर्माण करणार आहे. नातेसंबंधातील गोंधळ तुमच्या स्वभावात राग आणि चिडचिड निर्माण करेल. त्यामुळे या आठवड्यात तुमच्या समस्यांवर लक्षकेंद्रित करा. अन्यथा तुमचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. 


सिंह (Leo Zodiac) 


सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा भाग्यशाली ठरणार आहे. या लोकांना अनपेक्षित लाभ होणार आहे. त्यामुळे तुम्ही गुंतवणुकीचाही विचार करणार आहात. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य लाभणार आहे. कौटुंबातही आनंद आणि प्रसन्न वातावरण असणार आहे. 


कन्या (Virgo Zodiac)    


या आठवडा कन्या राशीच्या लोकांसाठी सकारात्मक असणार आहे. या लोकांची लोकप्रियता वाढणार असून सर्जनशील क्षेत्रात तुमचं कौतुक होणार आहे. तुमच्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा आणि उत्साह पाहिला मिळणार आहे. कुटुंब आणि मित्र परिवारांसोबत आनंदी क्षण व्यतित करणार आहात. 


तूळ (Libra Zodiac)  


टॅरो कार्ड्स गणितानुसार हा आठवडा तुमच्यासाठी गेल्या आठवड्यापेक्षा चांगला नसणार आहे. तुमच्या स्वभावात आक्रमता दिसून येणार आहे. शिवाय तुम्ही काम नसतानाही उगाचच पैसे खर्च करणार आहात. जोडीदारासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. शक्य तेवढं या आठवड्यात शांत राहिल्यास परिस्थिती नियंत्रणात राहिल. 


वृश्चिक (Scorpio Zodiac)   


या राशीच्या लोकांसाठी आठवडा खास राहणार असून टॅरो कार्ड्सच्या गणितातून दिसून येत आहे. या आठवड्यात सहकारी तुम्हाला आकर्षित करणार आहे. नोकरीच्या ठिकाणी नवीन संधींमध्ये यश मिळणार आहे. आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी या आठवड्यात घ्यावी लागणार आहे. 


धनु (Sagittarius Zodiac) 


धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा थोडं कमकुवत करणारा ठरणार आहे. जनसंपर्क सुधारण्यासाठी तुम्हाला लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. तुम्हाला या आठवड्यात उदास वाटणार आहे. अगदी तुमच्या हितचिंतकांकडूनही तुमच्यावर टीका होणार आहे. वाणीवर नियंत्रण ठेवा. मनावर संयम ठेवा. 


मकर (Capricorn Zodiac)   


हा आठवडा मकर राशीच्या लोकांसाठी बिझी बिझी असणार आहे. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होणार आहे. कार्यक्षेत्रातही प्रगतीतून तुम्हाला आराम मिळणार आहे. कुटुंब आणि मित्रपरिवारासोबत आनंदी वातावरणात वेळ घालविणार आहात. 


कुंभ (Aquarius Zodiac) 


या आठवड्यात कुंभ राशीच्या लोकांसाठी अनेक चांगल्या संधी वाट पाहत आहेत. या आठवड्यात तुमचं कौटुंबिक जीवन पूर्वीपेक्षा सकारात्मक आणि आनंदी असणार आहे. कौटुंबिक जीवनाचा आनंद घेणार आहात. या आठवड्यात तुम्हाला लाभ होणार आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळणार आहे.


मीन  (Pisces Zodiac)  


टॅरो कार्ड्स गणितानुसार मीन राशीच्या लोकांना या आठवड्यात नवीन नोकरीची ऑफर मिळणार आहे. मात्र निर्णय विचारपूर्वक घ्या. या आठवड्यात तुमच्या स्वभावात आक्रमकता असणार आहे. अनावश्यक खर्च टाळणे तुमच्या हिताचं ठरेल. जोडीदारासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती टॅरो कार्डवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)