Weekly Tarot Card Horoscope:साप्ताहिक टॅरो कार्ड राशीभविष्यानुसार  या आठवड्यात कामात लक्ष न देणे मेष राशीच्या लोकांसाठी त्रासदायक ठरू शकते. दुसरीकडे, वृषभ राशीच्या लोकांना जीवनसाथी मिळू शकतो. साप्ताहिक टॅरो राशीनुसार हा आठवडा सर्व 12 राशींसाठी कसा राहील हे जाणून घ्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष


तुमच्या कामात लक्ष द्या, अन्यथा प्रकरण आणखी बिघडू शकते. कठोर परिश्रम करण्यापासून मागे हटू नका. व्यवसायाला पुढे नेण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला फायदा होईल. हाती पैसा असेल.


वृषभ  


तुमची कारकीर्द पुन्हा एकदा वेगाने प्रगती करेल. सुखद बदल होऊ शकतात. विवाहाची बाब निश्चित होऊ शकते. आरोग्य चांगले राहील. (अधिक वाचा - Monthly Shivratri: या दिवशी असेल मार्गशीर्ष महिन्याची शिवरात्री, अशी करा पूजा-व्रत; प्रत्येक इच्छा होईल पूर्ण)


मिथुन 


या राशीच्या लोकांनी काळजी घेण्याची गरज आहे. जोडीदाराशी भांडण होऊ शकते. प्रोफेशनल लाइफमध्ये समस्या येऊ शकतात. खोटे बोलणे टाळा. 


कर्क 


तुम्ही खूप व्यस्त असाल आणि नेहमी कामात मग्न राहू शकता. कामाचा ताण तुम्हाला थकवा देईल. स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी वेळ काढा. 


सिंह  


करिअरसाठी हा आठवडा उत्तम ठरेल. काही चांगली बातमी ऐकू येईल, ज्यामुळे तुम्ही पार्टीच्या मूडमध्ये असाल. उत्पन्न वाढेल. त्यामुळे चांगला पैसा हाती राहिल.


कन्या  


शत्रूंपासून दूर राहणे चांगले. विनाकारण कोणाकडे बोट दाखवू नका, भांडणासाठी प्रवृत्त करू नका. मात्र, प्रकरण गुंतागुंतीचे झाले तर विजय तुमचाच असेल. भावनिक होऊ शकतो. 


तूळ 


जोडीदारापासून थोडे अंतर ठेवा. तुम्ही स्वतःला जास्त वेळ देऊ शकता. करिअर चांगले जाईल आणि तुमचे जास्त लक्ष कामावर राहील. नवीन करार किंवा करारावर स्वाक्षरी करु शकता. 


वृश्चिक  


लग्न होण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला तुमचा आवडता जोडीदार मिळू शकेल. करिअरसाठीही वेळ चांगला आहे. पगार वाढण्याची शक्यता आहे. (अधिक वाचा : Heart Attack : हृदयविकाराचा झटका येण्याच्या 4 आठवडे आधी मिळतात हे संकेत, या 10 गोष्टींकडे करु नका दुर्लक्ष)


धनु


सहलीला जाण्याचा बेत होऊ शकतो. करारावर सही करू शकतो. नवीन काम सुरु करू शकाल. व्यस्त राहतील. वेळ चांगला आहे. 


मकर 


आपले ध्येय पूर्ण करण्यात व्यस्त राहाल. कामावर लक्ष केंद्रित कराल. वैयक्तिक जीवनाकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते. 


कुंभ  


वैयक्तिक आयुष्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. संबंध अधिक चांगले होतील. वैयक्तिक जीवनाकडे लक्ष दिल्यास फायदा होईल. करिअर सामान्य राहील. आरोग्याकडे लक्ष द्या. 


मीन 


निराशेचे वर्चस्व राहील. कामात अडकल्याने त्रास होईल. हा आठवडा आरोग्यासाठी चांगला म्हणता येणार नाही. ही वेळ संयमाने घ्या. 


 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)