Dream Science Meaning: आपल्या पैकी प्रत्येक जण झोपेत स्वप्न पाहतो. स्वप्नांच्या मागे अनेक रहस्यं दडलेली असतात. रात्री पडणारी स्वप्नं एखाद्या व्यक्तीला भविष्यातील घटनांबद्दल सावध करतात. काही स्वप्ने शुभ मानली जातात तर काही अशुभ मानतात. मात्र तुम्हाला माहितीये का, प्रत्येक स्वप्नातील घटनेचा अर्थ स्वप्नशास्त्रात स्पष्ट करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सनातन धर्मात स्वप्नविज्ञानाला खूप महत्त्व आहे. असं मानलं जातं की, स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टी आपल्या भविष्यातील घटना दर्शवतात. स्वप्न शास्त्रानुसार प्रत्येक स्वप्नाचे वेगळे महत्त्व आणि संकेत असतात. हे शुभ आणि अशुभ दोन्ही असू शकतं. आज आपण जाणून घेऊया स्वप्न शास्त्रात दिसणाऱ्या कोणत्या गोष्टींना शुभ मानलं जातं.


स्वप्नात झाडं दिसणं


अनेकांना स्वप्नात झाड दिसत असेल. पण तुम्हाला या स्वप्नाचा अर्थ माहितीये का? स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्हाला स्वप्नात झाड दिसला तर ते तुमच्यासाठी शुभ संकेत आहे. या स्वप्नाचा अर्थ असा आहे की तुमचे नशीब लवकरच मोठे वळण घेणार आहे. म्हणजेच तुमच्यावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आहे.


रिकामी भांडं दिसणं


जर तुम्हाला स्वप्नात रिकामी भांडी दिसली तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला कुठून तरी पैसे मिळणार आहेत. हे लक्ष्मीच्या आगमनाचं लक्षण स्वप्न शास्त्रात सांगण्यात आलं आहे. स्वप्न शास्त्रानुसार, हे स्वप्न शुभ मानले जाते. 


स्वप्नात मंदिर दिसणं


स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्हाला झोपताना स्वप्नात मंदिर दिसत असेल तर ते एक शुभ संकेत मानला जातो. या स्वप्नाचा अर्थ असा आहे की तुमच्या देवाच्या आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे. तसंच जर तुम्हाला स्वप्नात मंदिर दिसलं तर तुमच्या आयुष्यात लवकरच काहीतरी चांगली गोष्ट घडणार आहे.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती स्वप्न शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )