Love Astrology: आपल्यापैंकी प्रत्येक जण कधी ना कधी तरी प्रेमात पडतात. आपली मैत्री होते मग मैत्रीचे रूपांतर हे प्रेमात होते (Love and Breakup). एखाद्या व्यक्तीशी आपली इतकी जवळची मैत्री होते की आपण त्या व्यक्तीच्या प्रेमात आकंठ बुडून जातो. परंतु नात्यात फारसा दुरावा येयलाही वेळ लागत नाही. प्रेमात आकंठ बुडालेले दोन प्रेमी युगुल एकमेकांचे तोंड न पाण्याचाही निर्णय घेतात. याला कारणं काहीही असली तरी आपल्या नात्यातील दुराव्या मुळे त्यांच्या अनेकदा भांडणं तंडेही होतात आणि या भांडणाचे रूपांतर हे ब्रेकअपमध्ये (Astrology Behind Breakup) होयलाही वेळ लागत नाही. त्यामुळे कधी काही एकमेकांच्या प्रेमात असणारे एकमेकांचे दुश्मन कधी होतील हेही कळायला वेळ लागत नाही. परंतु यामागे जोतिषशास्त्रही काहीतरी वेगळं सांगतं आहे.


  1. COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    अनेकांच्या कुंडलीत हे राहू, केतू आणि चंद्राचा योग (Chandra Yog) असल्यास प्रेमात भांडणं येऊ शकतात. त्याचसोबत तुमच्या कुंडलीतील सहाव्या, आठव्या आणि बाराव्या भावात चंद्राची स्थिती कमजोर असेल तेव्हा ब्रेकअप होण्याची शक्यता असते. 

  2. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत जर सप्तम स्वामी (Saptam Swami) असेल आणि त्यामुळे शुक्र पिडीत असेल तर एकतर्फी प्रेम, नात्यात भांडणं अशा समस्या वाढू शकतात. 

  3. असं म्हटलं जातं की आपल्या जन्मपत्रिकेतील ग्रहांमुळे आपले ब्रेकअप होते. ज्योतिषशास्त्रानुसार जर का तुमच्या कुंडलीत 7वा स्वामी पीडित असेल तर तुमच्या प्रेमाच्या नात्यात दुरावा येऊ शकतो. तेव्हा ब्रेकअप होऊ शकते. 

  4. जन्मकुंडलीत जर का सहाव्या, आठव्या आणि बाराव्या भावात पंचम स्वामी किंवा सप्तम स्वामी असेल तेव्हा प्रेमात अपयश मिळू शकते. 

  5. कुंडलीत जर का पंचम आणि सप्तम दोन्ही स्वामी पीडित असतील तर अशा व्यक्तीची फसवणूक होण्याची शक्यता असते. 


यापैंकी अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे घरातील आईवडिलांनाही मोठा धोका निर्माण होऊ शकतो. असं म्हणतात की मंगळ, सुर्य आणि शनि यापैंकी कोणतेही ग्रह कुंडलीच्या उच्च राशीत असतील तर त्याची दृष्टी जर कुंडलीच्या पाचव्या भावात आणि सातव्या भावात पडल्यास प्रेमात अडथळे येऊ शकतात. 


प्रेमात आणि नात्यात दुरावा येयला फारसा वेळ लागत नाही त्यातून अनेकदा आपल्यालाही नात्यांमध्ये अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते त्यामुळे सगळ्यांच्याच उरावर एक प्रश्न असतो की नक्की आपल्या नात्यात दुरावा येतोय तरी का, तेव्हा संभाषणानंही नात्यातील दुरावा हलकेच दूर होऊ शकतो. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)