Shani Sade Sati : वैदिक ज्योतिषशास्त्रातील शनी हा सर्वात महत्त्वाचा ग्रह आहे. 9 ग्रहांपैकी शनिदेव सर्वात संथ गतीने गोचर करतो. त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी अडीच वर्ष लागतो. शनि आणि शनि साडेसाती हा उच्चारानेच जाचकाला घाम फुटतो. शनिदेव हा न्याय देवता आणि कर्मदाता मानला जातो. त्यामुळे चांगल कर्म केल्यास शनिदेव चांगले फळं देतो आणि वाईट केल्यास शिक्षा देतो असं म्हणतात. आज आपण शनिची साडेसाती आणि त्याचा जाचकाच्या आयुष्यावर कसा परिणाम होतो ते पाहूयात. (what is shani sade sati and auspicious inauspicious impact on zodiac signs astrology)


शनिची साडेसाती म्हणजे काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनीदेवाचा प्रभाव जाचकांवर हा साडेसात वर्ष असतो, ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. शनि अडीच वर्षाने आपलं स्थान बदलतो.  या अर्थ जर जाचकाचे आयुष्य हे सरासरी असेल त्याचा आयुष्यात साडेसाती ही दोन वेळा येते. यानुसार 12 राशींचा गणितानुसार शनिदेवाला एका राशीतून निघालावर त्याच राशीत येण्यासाठी 30 वर्षाचा कालावधी लागतो. 


आता या गणितानुसारजाचकाच्या आयुष्यात साडेसातीचा प्रभाव हा तीन टप्प्यात दिसतो.  पहिलं अडीचकं किंवा उदयोन्मुख अवस्था, दुसरं अडीचकं आणि तिसरं अडीचकं असं म्हणतात. यालाच उदय टप्पा,शिखर टप्पा आणि अष्ट टप्पा म्हणूनही ओळखलं जातं.


शनि साडेसातीच्या 'या' टप्प्यात सर्वात जास्त होतो त्रास


पहिलं टप्प्यात मालमत्तेशी संबंधित वाद होतात. व्यक्तीला खासगी आयुष्यातही अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.


दुसऱ्या टप्पात पैशांसाठी चणचण जाणवते. गंभीर आजार होतात. कुटुंब, व्यापार आणि नोकरीत अनेक अडचणी येतात.


तिसऱ्या टप्प्यात व्यक्तीला काही किरकोळ समस्यांना किंवा आजारांचा सामना करावा लागतो. 


2023 मध्ये कोणत्या रासींच्या कितव्या टप्पाची साडेसाती सुरु आहे?


सध्या मकर, कुंभ आणि मीन राशींची साडेसाती सुरु आहे. मकर राशींच्या लोकांचातिसरा टप्पा सुरू आहे.कुंभ राशीच्या व्यक्तींचा दुसरा टप्पा सुरू आहे. तर मीन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात शनिच्या पहिला टप्पा सुरु आहे. 


शनी साडेसाती उपाय


शनिवारी लोखंड, काळी उडीद डाळ, काळे तीळ किंवा काळे कापड दान करा. 


शनिवारी कोणत्याही शनि मंदिरात जाऊन मोहरीचे तेल, काळे तीळ आणि लोखंडी खिळे मिक्स करुन शनिदेवाला अर्पण करा. 


शनिवारी हनुमानजींची पूजा करुन हनुमान चालिसाचा पाठ करा. 


शनिवारी नियमितपणे सकाळी पक्ष्यांना धान्य आणि पाणी द्या.


शनिवारी मुंग्यांना पीठ आणि साखर खायला द्या. 


शनिवारी सूर्यदेवाला जल अर्पण करा.


शनिवारी सकाळी आणि संध्याकाळी जेवणात काळे मीठ आणि काळी मिरीचं सेवन करा.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)