Gupt Navratri 2024 :  हिंदू धर्मात स्त्री शक्तीचा जागर मोठ्या उत्साहाने केला जातो. यात शारदीय नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? वर्षात 5 नवरात्री येतात आणि त्यातील माघ गुप्त नवरात्री हीदेखील विशेष असते. वर्षात चैत्र नवरात्री, पौष, गुप्त नवरात्री, आषाढ गुप्त नवरात्री, शारदीय नवरात्री आणि माघ महिन्यातील गुप्त नवरात्री. देशभरात शारदीय नवरात्री 3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबरदरम्यान साजरा करण्यात येणार आहे. तर 10 फेब्रुवारीपासून 18 फेब्रुवारीपर्यंत गुप्त नवरात्री साजरा करण्यात येत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का गुप्त नवरात्री आणि शरद नवरात्रीमध्ये काय फरक आहे. (What is the difference between Sharad Navratri and Gupta Navratri Do not do these things till February 18 Gupt Navratri 2024 )


गुप्त नवरात्री आणि शारदीय नवरात्रीपेक्षा कशी वेगळी?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शारदीय नवरात्रीत दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा करण्यात येते. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री यांची मनोभावे पूजा केली जाते. तर गुप्त नवरात्रीमध्ये दहा महाविद्या काली, तारा देवी, त्रिपुरा सुंदरी, भुवनेश्वरी, छिन्नमस्ता, त्रिपुरा भैरवी, ध्रुमावती, बगलामुखी आणि कमलांगी देवीची आराधना केली जाते. गुप्त नवरात्रीमध्ये शक्तीची पूजा अत्यंत गुप्तपणे करण्यात येत असते. असे मानले जाते की गुप्त नवरात्रीची पूजा जितकी गुप्ततेने केली जाते तितकी देवीची कृपा तुम्हाला प्राप्त होते. तांत्रिक विधी, शक्ती साधना आणि महाकाल इत्यादींशी संबंधित लोकांसाठी गुप्त नवरात्र महत्त्वाची असते. 


गुप्त नवरात्रीमध्ये भगवान विष्णू निद्राकाळात असतात, असं धार्मिक शास्त्रात सांगण्यात आलय. मग अशा स्थितीत देवतांची शक्ती कमकुवत होत असते, अशी मान्यता आहे. त्याच वेळी रुद्र, यम, वरुण इत्यादींचा प्रभाव पृथ्वीवर वाढतो असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. या आपत्तींच्या रक्षणासाठी गुप्त नवरात्रीत 10 महाविद्यांची पूजा करण्यात येते. 


हेसुद्धा वाचा - Gupt Navratri 2024 : माघ गुप्त नवरात्रीला दुर्मिळ योगायोग! पुढील 9 दिवस 'या' राशींना होणार लाभ


चुकूनही करू नका 'ही' कामं


गुप्त नवरात्रीत कोणालाही तुच्छ लेखू नका आणि वाईट शब्द बोलू नका.


 केस, आपली नखं कापू नका, दाढी करू नका.


देवीच्या पूजेच्या वेळी काळे कपडे परिधान करू नका. 


मांस, दारू आणि धुम्रपान सेवन टाळा.


कोणत्याही प्रकारचा हिंसाचार टाळा.


कोणत्याही स्त्रीचा अपमान करू नका. 


तुमची उपासना पूर्णपणे गुप्त ठेवा.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)