COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : आजपासून श्रावण महिना सुरु झाला असून, उद्या पहिला श्रावणी सोमवार आहे. श्रावणी सोमवारला हिंदू संस्कृतीत फार महत्त्वाचे मानले जाते. सोमवारी उपवास पाळला जातो. मांस, मटण हे श्रावण महिन्यात खाल्ल जातं नाही. यामागे अनेक किस्से सांगितले जातात. या श्रावणी सोमवारचं नेमकं काय महत्त्व असतं? त्यादिवशी उपवास का करतात? आणि शंकराला शिवामूठ आणि दूध का वाहतात? याबाबत ज्येष्ठ खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी झी २४ तास ला माहिती दिलीयं.


तेवढंच पुण्य


या महिन्यात श्रवण नक्षत्र आकाशात दर्शन देत म्हणून याला श्रावण महिना म्हणतात. तसेच या महिन्यात लाखो भाविक शंकराच्या पिंडीवर दुध दही अर्पण करतात. आता लोकसंख्या वाढली आहे, भाविकांची संख्याही वाढली आहे. आपली मंदिर स्वच्छ आणि पवित्र राहिली पाहिजेत यासाठी एक चमचा दुध अर्पण केलं तरी तेवढंच पुण्य मिळतं असे यावेळी ज्येष्ठ खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले.