Makar Sankranti 2023: मकर संक्रांती 14 की 15 जानेवारीला! जाणून घ्या नेमकी तारीख आणि शुभ मुहूर्त
Makar Sankranti 2023: नववर्ष सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. नववर्षात म्हणजेच जानेवारी महिन्यात पहिला सण मकर संक्रांती येतो. मकर संक्रांतीला सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. सूर्याच्या या गोचराला मकर संक्रांती बोललं जातं.
Makar Sankranti 2023: नववर्ष सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. नववर्षात म्हणजेच जानेवारी महिन्यात पहिला सण मकर संक्रांती येतो. मकर संक्रांतीला सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. सूर्याच्या या गोचराला मकर संक्रांती बोललं जातं. भारतातील इतर ठिकाणी मकर संक्रांतीला खिचडी, उत्तरायण आणि लोहडी संबोधलं जातं (Uttarayan 2023). या दिवसापासून शुभ कार्याला सुरुवात होते. सूर्य मकर राशीत जवळपास 1 महिना असणार आहे. मकर संक्रांती दरवर्षी 14 जानेवारीला साजरा केला जातो. मात्र 2023 या वर्षात मकर संक्रांती 15 जानेवारी, रविवार येत आहे. या दिवसी सूर्य उपासना, स्नान आणि दानाला विशेष महत्त्व आहे. मकर संक्रांतीला खरमास संपतो.
हिंदू पंचांगानुसार, 2023 मध्ये मकर संक्रांती 15 जानेवारीला साजरी केली जाईल. ग्रहांचा राजा सूर्यदेव 14 जानेवारीला रात्री 8 वाजून 21 मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करते. उदयतिथीनुसार मकर संक्रांती 15 जानेवारी 2023 ला साजरी केली जाईल.
मकर संक्रांती पुण्य काल मुहूर्त: 7 वाजून 15 मिनिटे ते 12 वाजून 30 मिनिटांपर्यंत
एकूण कालावधी: 5 तास 14 मिनिटं
महापुण्य काल मुहूर्त: 7 वाजून 15 मिनिटं ते 9 वाजून 15 मिनिटांपर्यंत
महापुण्य कालावधी: 2 तास
बातमी वाचा- Gangajal Upay: गंगाजल तोडगा वापरा आणि करिअरमध्ये मिळवा असा फायदा!
मकर संक्रांतीचं महत्त्व आणि उपाय
मकर संक्रांतीला सकाळी लवकर उठून स्नान करा. आंघोळीच्या पाण्यात काळं तीळ आणि गंगाजल टाका. यामुळे सूर्याची कृपा आणि कुंडलीतील ग्रह दोष दूर होतो. खासकरून शनि आणि सूर्याची कृपा मिळते. कारण सूर्यदेव पुत्र शनिदेवांच्या घरी प्रवेश करतात.
मकर संक्रांतीला सूर्यदेवाला अर्घ्य देण्याचं महत्त्व आहे. या दिवशी तांब्यात पाणी घेऊन त्यात काळे तीळ, गुळ, लाल चंदन, लाल फुल, अक्षता टाकून 'ओम सूर्याय नम:' मंत्राचा जप करा आणि अर्घ्य द्या.
मकर संक्रांतीला गरीबांना दान करा. या दिवशी दान दिल्याने पुण्य लाभतं.
मकर संक्रांतीला खिचडी खाण्याची परंपरा आहे. म्हणून या दिवसाला खिचडी पर्व संबोधलं जातं.
मकर संक्रांतीला तीळगूळ खा आणि वाटा
मकर संक्रांतीला वसंत ऋतु सुरू होतो आणि या दिवसापासून रात्र छोटी आणि दिवस मोठा होतो.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)