Raksha Bandhan 2023: हिंदू पंचांगानुसार यंदा अधिक महिना असणार आहे. त्यामुळं श्रावण महिना लांबला आहे. मंगळवार 18 जुलैपासून अधिक मास सुरु होईल आणि 16 ऑगस्ट रोजी अधिक महिना संपेल. त्यानंतर खऱ्याअर्धाने श्रावण महिना सुरु होणार आहे. मात्र रक्षाबंधनाचा सण लांबणार आहे. श्रावण शिवरात्री आणि रक्षाबंधन यात 46 दिवसांचे अंतर राहणार आहे. तसंच, यंदा 2023मध्ये रक्षाबंधनाच्या सणावर भद्राची छाया आहे. त्यामुळं राखी बांधण्याचा योग्य मुहूर्त, तिथी, वेळ कोणती आहे हे जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भद्रकाळाच्या वेळेत बहिणी भावाला राखी बांधत नाहीत. भद्रकाळात राखी बांधणे अशुभ मानले जाते. ज्यावेळेत श्रावण पौर्णिमा तिथी सुरू होते. त्याचवेळेत भद्रकाळही सुरु होतो. अशा स्थितीत रक्षाबंधन कधी साजरे करावे?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. भद्राकाळात राखी कधी बांधावी आणि राखी बांधण्याची योग्य तिथी काय आहे याची माहिती घेऊया. 


ज्योतिषशास्त्रानुसार, रक्षाबंधनादिनी राखी बांधताना भद्रा योग असणे अशुभ मानले जाते. लंकाधीश रावणाच्या बहिणीने भद्रा योग असताना त्याला राखी बांधली होती. रावणाच्या सर्वनाशाला हेदेखील एक कारण होते, अशी मान्यता आहे. भद्रा ही सूर्यदेवाची कन्या होती. एखाद्या शुभ कार्यावेळी भद्रा योग असणे, अशुभ मानले जाते. म्हणून भद्राकाळ वगळून योग्य मुहूर्तावर रक्षाबंधन साजरी करा.


हिंदू पंचागानुसार श्रावण पौर्णिमा 30 ऑगस्ट रोजी 10 वाजून 58 मिनिटांनी सुरू होत आहे. तर 31 ऑगस्ट रोजी 7 वाजून 05 मिनिटांनी संपत आहे. यात भद्राकाळ सकाळी 10 वाजून 58 मिनिटांनी सुरू होत असून रात्री 9 वाजून ०१ मिनिटांपर्यंत आहे. त्यामुळं 30 ऑगस्ट रोजी रक्षा बंधन साजरे केले जाऊ शकते. 


30 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनावर भद्राची छाया असल्याने सकाळी राखी बांधण्याचा मुहूर्त नाहीये.  त्यामुळं त्यादिवशी रात्री राखी बांधण्याचा मुहूर्त आहे. तसंच, 31 ऑगस्ट रोजी पौर्णिमा सकाळी ७ पर्यंत आहे. अशावेळी पौर्णिमा संपण्याच्या आधी तुम्ही राखी बांधू शकता. त्यामुळं यंदा 30 आणि 31 दोन्ही दिवस राखी बांधू शकता. 


30 ऑगस्टला राखी बांधण्याचा योग्य मुहूर्त


रक्षाबंधन मुहूर्तः 30 ऑगस्ट रोजी रात्री ९.०१ नंतर शुभ मुहूर्त आहे


रक्षाबंधन मुहूर्तः 31 ऑगस्ट सूर्योदय काळापासून सकाळी ७. ०५ पर्यंत शुभ मुहूर्त


रक्षाबंधन 2023 भद्राकाळ


30 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सणाच्या दिवशी भद्राकाळ सकाळी 10.58 ते रात्री 9.01 पर्यंत 


भद्रापुच्छः संध्याकाळी 5.30 ते संध्याकाळी 6.31 पर्यंत
भद्रामुखः संध्याकाळी 6.31 ते संध्याकाळी 8.11 पर्यंत