Sawan Month Significance: श्रावण मासी हर्ष मानसी कवितेच्या ओळी ऐकल्या आहेत. श्रावणात ऊन पावसाचा खेळ सुरू असतो. श्रावणातील पाऊसही सगळ्यांना आवडतो. हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आषाढ पौर्णिमेनंतर श्रावणाची सुरुवात होते. या महिन्यात भोलेनाथाची विधीवत पूजा केल्याने भोलेशंकर प्रसन्न होऊन सर्व संकटांपासून मुक्ती मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. 


या महिन्यात शिवलिंगाच्या रुद्राभिषेकालाही विशेष महत्त्व आहे. या महिन्यात शिवलिंगाची पूजा करणे श्रेष्ठ मानले जाते. असे मानले जाते की जो व्यक्ती या महिन्यात सोमवारी व्रत करतो, त्याची मनोकामना भोलेशंकर पूर्ण करतात असं मानलं जातं. 


हिंदू पंचागानुसार श्रावण महिन्याची सुरुवात 13 जुलैपासून होणार आहे. आषाढ पौर्णिमेच्या पुढच्या दिवसापासून श्रावण महिना सुरू होतो. श्रावणातील पहिला सोमवार 14 जुलै रोजी आहे. 12 ऑगस्टला शेवटची श्रावण पौर्णिमा असणार आहे. श्रावणातील पहिलं व्रत 18 जुलैच्या सोमवारी ठेवावं.  शेवटचं व्रत 12 ऑगस्ट रोजी असणार आहे. 


श्रावण सोमवार
14 जुलै - श्रावण सोमवार शुभारंभ
18 जुलै- श्रावण सोमवार
25 जुलै- श्रावण सोमवार
01 ऑगस्ट- श्रावण सोमवार 
08 ऑगस्ट- श्रावण सोमवार
12 ऑगस्ट- श्रावण सोमवार शेवटचा दिवस


हिंदू कॅलेंडरनुसार वर्षातील पाचवा महिना श्रावण असतो. शिवपुराणानुसार स्वतः भोलेशंकरांनी या महिन्याबद्दल सांगितले आहे. श्रावणात भगवान शंकराची मनोभावे पूजा करतात. यावेळी त्याला अभिषेक घालतात. माहात्म ऐकावे आणि पूजा करावी. या महिन्यात मांसाहार वर्ज असतो.