Sankashti Chaturthi 2024 : प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी असतात एक विनायक आणि दुसरी संकष्टी. नवीन वर्षाला सुरुवात झाली असून या वर्षातील पहिली विनायक आणि संकष्टी चतुर्थी कधी आहे त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. या दोन्ही चतुर्थी लाडक्या बाप्पा विघ्नहर्ता गणरायाला समर्पित केल्या आहेत. यादिवशी गणरायाची सदैव कृपादृष्टी राहण्यासाठी व्रत केलं जातं. हिंदू पंचांगानुसार या वर्षभरात कधी संकष्टी आहे त्याबद्दल जाणून घेऊयात. (When is the first Sankashti Chaturthi and vinayak chaturthi 2024 of the new year Know Tithi  auspicious time and religious significance)


नवीन वर्षातील पहिली विनाय चतुर्थी 2024 कधी आहे? (vinayak chaturthi 2024)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंचांगानुसार पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी 14 जानेवारी 2024 ला असणार आहे. चतुर्थी सकाळी 7:58 वाजेपासून 15 जानेवारी 2024 ला पहाटे 4:58 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार 14 जानेवारी 2024 ला  विनायक चतुर्थी साजरा करण्यात येणार आहे. 


नवीन वर्षातील पहिली संकष्ट चतुर्थी कधी आहे?


पंचांगानुसार या वर्षातील पहिली संकष्ट चतुर्थी ही 29 जानेवारी 2024 ला असणार आहे. या संकष्ट चतुर्थीला लंबोदर संकष्टी चतुर्थी असं म्हणतात. चतुर्थीची तिथी सकाळी 6.11 वाजेपासून 30 जानेवारीला सकाळी 8.54 वाजेपर्यंत असणार आहे.


'या' वर्षभरातील संकष्टी चतुर्थीची लिस्ट 


फेब्रुवारी 2024


28 फेब्रुवारी 2024 (बुधवार) द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी -  शुभ मुहूर्त सकाळी 1.53 वाजेपासून 29 फेब्रुवारीला पहाटे 4.18 वाजेपर्यंत


मार्च 2024 


29 मार्च 2024 (शुक्रवार) – भालचंद्र संकष्टी चतुर्थी - शुभ मुहूर्त संध्याकाळी 6.57 वाजेपासून 29 मार्चला सकाळी 8.21 वाजेपर्यंत 


एप्रिल 2024 


27 एप्रिल 2024 (शनिवार) विकट संकष्टी चतुर्थी -  शुभ मुहूर्त -  सकाळी 8.18 वाजेपासून 28 एप्रिलला सकाळी 8.28 वाजेपर्यंत


मे 2024 


26 मे 2024 (रविवार) एकदंत संकष्टी चतुर्थी - शुभ मुहूर्त - सकाळी 6.06 वाजेपासून 27 मे रोजी पहाटे 4.35 वाजेपर्यंत 


जून 2024  


25 जून 2024 (मंगळवार) कृष्णपिंगला संकष्टी चतुर्थी -  शुभ मुहूर्त - पहाटे 1.13 वाजेपासून 25 जूनला सकाळी 11.11 वाजेपर्यंत. मंगळवारी संकष्टी आल्यामुळे ही अंगारकी चतुर्थी म्हणूनही ओळखली जाते.


जुलै 2024  


24 जुलै 2024 (बुधवार) गजानन संकष्टी चतुर्थी -  शुभ मुहूर्त- सकाळी 7.30 वाजेपासून 25 जुलै रोजी पहाटे 4.39 वाजेपर्यंत 


ऑगस्ट 2024  


22 ऑगस्ट 2024 (गुरुवार) हेरंब संकष्टी चतुर्थी - शुभ मुहूर्त - सकाळी 1.46 वाजेपासून 23 ऑगस्टला सकाळी 10.39 वाजेपर्यंत 


सप्टेंबर 2024


21 सप्टेंबर 2024 (शनिवार) विघ्नराज संकष्टी चतुर्थी - शुभ मुहूर्त - 20 सप्टेंबरला रात्री 9.15 वाजेपासून 21 सप्टेंबरला सकाळी 6.14 वाजेपर्यंत 


ऑक्टोबर 2024


20 ऑक्टोबर 2024४ (रविवार) वक्रतुंड संकष्टी चतुर्थी - शुभ मुहूर्त - सकाळी 6.46 वाजेपासून 21 ऑक्टोबरला पहाटे 4.17 वाजेपर्यंत 


नोव्हेंबर 2024


19 नोव्हेंबर 2024 (मंगळवार) गणाधिप संकष्टी चतुर्थी - शुभ मुहूर्त - 18 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6.56 वाजेपासून 19 नोव्हेंबरला संध्याकाळी 5.28 वाजेपर्यंत 


डिसेंबर 2024 


18 डिसेंबर 2024 (बुधवारी) अक्षुर्थ संकष्टी चतुर्थी -  शुभ मुहूर्त -  सकाळी 10.06 वाजेपासून 19 डिसेंबरला सकाळी 10.03 वाजेपर्यंत 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)