मुंबई : जेव्हा एखादी व्यक्ती 8 तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ ऑफिसमध्ये घालवत असेल तर अर्थातच सहका-यांसोबत मैत्री होणार. भलेही सर्व जणांसोबत बेस्ट फ्रेन्डचं नातं नसलं तरी काही सहका-यांसोबत चांगली मैत्री नक्कीच होते. पण यातील एखादा सहकारी तुम्हाला गरजेपेक्षा जास्त अंटेशन देत असेल तर हे कशाचे संकेत आहेत? काय तो केवळ एक मित्र आहे की अजून काही? चला जाणून घेऊया असेच काही संकेत...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याचं हास्य
आपण रोजचं ऑफिसमधील प्रत्येकाला हसून गुड मॉर्निंग किंवा हाय-हॅलो करत असतो, यात नवीन काहीच नाही. पण जर एखादी व्यक्ती मोठ्या स्माईलसोबत तुमची गळाभेट घेत असेल तर याचा अर्थ नक्कीच ‘दाल मे कुछ काला है’. त्यावरून हे समजून घ्या की, तो तुम्हाला पसंत करतो. 


कामासोबत इतर गप्पा
जर तुमचा एखादा ऑफिस सहकारी तुमच्यासोबत कामाच्या गोष्टींसोबतच इतडच्या तितकडच्या म्हणजेच पर्सनल लाईफ, अडचणी, पसंत-नापसंत यांसारख्या गोष्टी डिस्कस करतात. तर समजून घ्या की, तो तुम्हाला एका सहका-या पेक्षाही जास्त मानतो. त्यामुळे तो तुमच्यासोबत बोलण्यासाठी कारणं शोधतो. 


कॉफी ब्रेकची वाट पाहणे
जर एखादी व्यक्ती स्ट्रिक्ट डेडलाईन असूनही आपलं काम सोडून तुमच्यासोबत कॉफी ब्रेक घेण्य़ासाठी येत असेल तर त्या व्यक्तीच्या निष्ठेवर आणि इमानदारीवर शंका घेऊ नका. होऊ शकतं की, तुमच्यासोबत वेळ घालवण्यासाठी तो काहीही करू शकत असेल. 


तुमची प्रशंका करत असेल
जर एखादी व्यक्ती तुमची लहानात लहान गोष्ट लक्षात ठेवत असेल आणि तुमच्या प्रत्येक दिवसाच्या लुकची प्रशंसा करीत असेल तर हे स्पष्ट आहे की, तो तुम्हाला पसंत करतो. 


सर्व गोष्टींची ठेवतो आठवण
तुम्ही गेल्या आठवड्यात काय बोललात, हेही त्यांना आठवत असतं. खाण्या-पिण्यापासून ते तुमच्या पसंती-नापसंतीची सर्व माहिती त्याला असते, तर समजून घ्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल वेगळ्या भावना आहेत.