Rakshabandhan 2022: हिंदू धर्मानुसार श्रावण महिना अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करुन देणार दिवस आहे. भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या या सणादिवशी बहीण आपल्या भावाला मनगटावर राखी बांधते. या दिवशी भावाला राखी बांधताना बहिण त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. त्याच वेळी, भाऊ बहिणींना भेटवस्तू देतात आणि त्यांचे संरक्षण करण्याचे वचन देतात. यावेळी पौर्णिमा 11 ऑगस्ट आणि 12 ऑगस्ट असा दोन दिवशी पडत आहे. त्यामुळे रक्षाबंधनाच्या तारखेबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे राखी नेमकी कोणत्या दिवशी बांधायची जाणून घ्या 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राखी बांधण्याची शुभ वेळ


श्रावण पौर्णिमा 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10.38 वाजता सुरू होईल आणि शुक्रवार, 12 ऑगस्ट रोजी सकाळी 07:05 वाजता समाप्त होईल. हिंदू पंचांगानुसार, 11 ऑगस्ट रोजी पूर्ण दिवस असल्यामुळे गुरुवारी, 11 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सण साजरा केला जाईल. हिंदू पंचांगानुसार, गुरुवारी, 11 ऑगस्टला पौर्णिमा असल्याने, या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधेल. या दिवशी राखी बांधण्यासाठी 12 वाजल्यानंतरची वेळ शुभ मानली आहे. या दिवशी 5:17 ते 6.18 ही वेळ शुभ आहे. 


रक्षाबंधन शुभ योग


अभिजीत मुहूर्त: दुपारी 12:08 ते 12:59 पर्यंत
अमृत ​​काळ: संध्याकाळी 06.55 ते 08.20 पर्यंत
रवि योग: सकाळी 06:07 ते 06:53 पर्यंत


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)