Vastu Tips: वास्तुशास्त्रात प्रत्येक वस्तूचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. इतकंच नाही तर कोणती वस्तू कोणत्या दिशेला ठेवावी याबाबतही सांगितलं गेलं आहे. वास्तुशास्त्र अग्नि, वायू, जल तत्वावर आधारित दिशांचं विश्लेषण केलं आहे. या सोबत हिंदू धर्मात प्रत्येक दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आठवड्यातील प्रत्येक वारावर ग्रहांचा प्रभाव असतो. या वारांची नावं देखील ग्रहांच्या नावावरून ठेवली गेली आहेत. राहु-केतु सोडले तर आठवड्यातील सातही वारांवर ग्रहांचा प्रभाव आहे.  हिंदू धर्मात कोणतेही कार्य करताना शुभ मुहूर्त आणि शुभ दिवस पाहिला जातो. त्या वारानुसार काम केल्यास शुभफल मिळतं. आज आपण कोणत्या वस्तूच्या खरेदीसाठी कोणता दिवस शुभ आहे, जाणून घेऊयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवार - सोमवार हा शिवाला समर्पित आहे. या दिवशी संगणक, मोबाईल इत्यादी इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करणे अशुभ मानले जाते. त्याचबरोबर या दिवशी धान्य, दुग्धजन्य पदार्थ खरेदी करणे शुभ असते.


मंगळवार - मंगळवार हा मारुतीचा वार मानला जातो. या दिवशी पादत्राणे किंवा लोखंडी वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते.


बुधवार- बुधवार हा गणपती आणि देवी सरस्वतीचा दिवस आहे. या दिवशी पुस्तके आणि स्टेशनरीच्या वस्तू खरेदी कराव्यात. या दिवशी औषधे, भांडी इत्यादी खरेदी करणे टाळा. 


गुरुवार- गुरुवार हा भगवान विष्णूचा दिवस आहे.  या दिवशी इलेक्ट्रॉनिक किंवा प्रॉपर्टीशी संबंधित वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. या दिवशी कोणतीही भांडी किंवा तीक्ष्ण वस्तू खरेदी करणे टाळा.


शुक्रवार - शुक्रवार देवी लक्ष्मीला समर्पित वार आहे. या दिवशी इलेक्ट्रॉनिक्स इत्यादी वस्तूंची खरेदी करणे शुभ असते. या दिवशी तुम्ही पूजेचं साहित्य, कपडे इत्यादी खरेदी करू शकता.


शनिवार - या दिवसावर शनिदेवांचं प्रभाव असतो. या दिवशी मोहरीचे तेल, तिळाचे तेल, मीठ इत्यादी खरेदी करू नये. शनि किंवा मारुती मंदिरात जायचं असल्यास एक दिवस आधी खरेदी करावे. या दिवशी मशिनरी आणि फर्निचर खरेदी करणे शुभ मानले जाते.


रविवार- सूर्यदेवांचा या दिवसावर प्रभाव असतो. या दिवशी लाल रंगाच्या वस्तू, गहू, औषधे आदींची खरेदी करता येते. या दिवशी लोखंडाशी संबंधित वस्तू खरेदी करणे टाळावे.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE24TAAS याची पुष्टी करत नाही.)