Ashadhi Ekadashi 2024 :  अमृताहूनी गोड, विठ्ठलाची ओढ, पांडुरंग पांडुरंग बोलती अभंग...अख्ख महाराष्ट्र विठुमय झाला आहे. अवघ्या काही दिवसांवर आषाढी एकादशी असणार आहे. हिंदू धर्मानुसार आषाढी एकादशी सर्वात मोठी आणि पवित्र एकादशी मानली जाते. पंचांगानुसार 16 जुलै 2024 रात्री 8:33 मिनिटांपासून 17 जुलैला रात्री 9:33 मिनिटांपर्यत असणार आहे. उदय तिथीनुसार 17 जुलै 2024 ला आषाढी एकादशी साजरी करण्यात येणार आहे. (Why is Ashadhi Ekadashi called Devshayani Ekadashi What is Chaturmas muhurta and importance of Ekadashi )


आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी का म्हणतात?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्येक महिन्यात दोन पंधरवाडे म्हणजे पक्ष असतात. एक शुक्ल पक्ष आणि दुसरा कृष्ण पक्ष या प्रत्येक पक्षातील अकराव्या तिथीला एकादशी असं म्हणतात. या एकादशींपैकी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील एकादशी विशेष महत्त्वाची मानतात. 


आषाढातील शुक्ल एकादशीस भगवान विष्णू झोपी जातात. त्यामुळे या एकादशीला शयनी एकादशी असं म्हणतात. झोपी गेलेले भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीला जागे होतात. त्यामुळे त्या प्रबोधिनी एकादशी असं म्हटलं जातं. 


चातुर्मास म्हणजे काय? (When Is Chaturmas)


हे चार महिने म्हणजेच चातुर्मास होय. सूर्य नाही म्हणजेच देवच नाही. तो कोठे तरी विश्रांतीसाठी गेला आहे. अशी कल्पना त्या वेळच्या लोकांनी केली. सूर्य वृत्रासुर नावाच्या राक्षसाच्या पाठलाग करीत समुद्रात हिंडत असतो असं मानले जाते. आषाढी - कार्तिक एकदाशीच्या दिवशी लोक उपवास करतात आणि भगवान विष्णुंच्या, विठ्ठलाच्या दर्शन घेतात. 


हेसुद्धा वाचा - Ashadhi Ekadashi 2024 : उपवास करायचा आहे, पण अ‍ॅसिडिटीचा त्रास होतो? मग काय खावे काय टाळावे जाणून घ्या


आषाढी एकादशीचा शुभ मुहूर्त (Ashadhi Ekadashi 2024 Shubh Muhurta)


ब्रह्म मुहूर्त : पहाटे 04:13 ते 04:53 पर्यंत
प्रातः सन्ध्या : पहाटे 04:33 ते 05:34 पर्यंत
विजय मुहूर्त : दुपारी 02:45 ते 03:40 पर्यंत
गोधूलि मुहूर्त : संध्याकाळी 07:19 ते 07:39 पर्यंत
सायाह्न सन्ध्या : रात्री 07:20 ते 08:22 पर्यंत
अमृत काल : संध्याकाळी 04:23 ते 06:03 पर्यंत
सर्वार्थ सिद्धि योग : सकाळी 05:34 ते दुसर्‍यादिवशी पहाटे 03:13 पर्यंत
अमृत सिद्धि योग : सकाळी 05:34 ते दुसर्‍या दिवशी पहाटे 03:13 पर्यंत


'एकादशी' हा शब्द कुठून आला?


भक्त प्रल्हाद त्याच्या नातवाचे नाव मृदूमान्य पण वृत्तीने हा प्रल्हादासारखा भक्त नव्हता. तो राक्षसी वृत्तीचा होता. त्याने घोर तपश्चर्या केली आणि भगवान शंकराला प्रसन्न केलं. भगवान शंकराने प्रसन्न होऊ त्याला वर दिला. एक स्त्री सोडून तुला कोणीही मारु शकणार नाही. या वरामुळे तो उन्मत्त झाला आणि अनाचार करु लागला. देवांनाही तो त्रास द्यायचा. त्याच्या त्रासाने भगवान ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकर गुहेत लपून बसले. 
काय करावे? या राक्षसाला ठार कसे करावे? असा विचार करीत असतांनाच त्यांच्या श्वासातून एक शक्ती निर्माण झाली. ती अत्यंत तेजस्वी होती. तिचं नाव होतं एकादशी. तिने मृदुमान्याशी युद्ध केलं आणि त्याला ठार मारलं. साऱ्या जगाला त्याच्या त्रासापासून मुक्त केलं. तेव्हापासून एकादशीच्या दिवशी भगवंताचं नामस्मरण पूजा अर्चा करुन उपवास करण्याची परंपरा आहे. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)