तृतीयपंथीचा आशिर्वाद का मानला जातो शुभ? काय आहे मान्यता?
तृतीयपंथी हे आपल्याला अनेक ठिकाणी सहज दिसून येतात. ज्यांना आपण किन्नर, हिजडा, छक्का आणि तृतीयपंथी अशा वेगवेगळ्या नावानेही ओळखतो. त्यांच्याकडे आपला आणि समाजाचा पाहण्याचा दृष्टीकोन जरी चांगला नसला तरी त्यांचा आशिर्वाद मात्र भाग्याचं मानलं जातं.
मुंबई : तृतीयपंथी हे आपल्याला अनेक ठिकाणी सहज दिसून येतात. ज्यांना आपण किन्नर, हिजडा, छक्का आणि तृतीयपंथी अशा वेगवेगळ्या नावानेही ओळखतो. त्यांच्याकडे आपला आणि समाजाचा पाहण्याचा दृष्टीकोन जरी चांगला नसला तरी त्यांचा आशिर्वाद मात्र भाग्याचं मानलं जातं.
तुम्हाला माहिती नसेल परंतू तृतीयपंथी यांनी तुम्हाला आनंदाने आशिवार्द दिला तर तुमचं भाग्य बदलायला वेळ लागणार नाही. त्यामुळे तृतीयपंथी यांना तुम्ही कधीही दुखवू नका. त्यांच्या भावना दुखावतील असं त्यांच्याशी वागवू नका. असं नेहमी म्हटलं जाते. त्यांच्या मनातून निघालेला शाप हा माणसाचे आयुष्य उद्ध्वस्त करु शकतो, असंही माणलं जातं. ज्योतिष शास्त्रात तृतीयपंथी विषयी अनेक उपाय सांगण्यात आलेत. हे उपाय केल्यास एखाद्याचे नशीब बदलू शकते. तृतीयपंथींच्या आशीर्वादाने माणूस श्रीमंत होतो. तसेच आशिर्वाद दिलेल्या व्यक्तीचं घरही नेहमी संपत्तीने भरलेले असते. याच विषयी चला जाणून घेऊया तृतीयपंथी संबंधित काय आहे मान्यता.
तृतीयपंथीकडून हे काम करुन घ्या
तृतीयपंथींकडून तुम्ही एक काम नक्की करुन घ्या. ते म्हणजे तुमच्या घरात लहान मुलं असतील तर त्यांना बुधवारी किंवा बुध ग्रहाच्या कोणत्याही नक्षत्रात बाळाला किंवा मुलाला तृतीयपंथींच्या मांडीवर बसवा. त्यांना तृतीयपंथींकडून आशिर्वाद द्यायाला लावा. त्यांनी आशिर्वाद दिला तर मुलाबरोबर तुमचंही नशीब बदलण्यास वेळ लागणार आहे.
तृतीयपंथींना या गोष्टी दान करा
तुम्ही चांगली मेहनत करुन देखील तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळत नसेल किंवा कामात तुम्हाला अनेक अडथळे येत असतील तर बुधवारी एखाद्या तृतीयपंथीला हिरवे कपडे आणि अंगठी दान करा. त्यांच्याकडून हा आशीर्वाद मागून घ्या. असं केल्यास तुमचं झोपलेले नशीब जागे होईल. तृतीयपंथीच्या आशीर्वादाने व्यक्तीचं करिअर आणि व्यवसायात प्रगती होण्यास सुरुवात होऊल.
तृतीयपंथीच्या आशिर्वादात ही गोष्ट मागा
अनेकांच्या म्हणण्यानुसार तृतीयपंथीचा आशिर्वाद हा चांगला असतो. म्हणूनच तृतीयपंथी कुठेही तुम्हाला दिसले तर त्याचा कधीच अपमान करु नका. त्यांचा सन्मान करा. त्यांना तुमच्या ऐपती नुसार दान करा, तुमच्याकडील काही गोष्टी दान करा. तसेच त्यांच्याकडून शक्य असल्यास, तुम्ही त्यांना आशिर्वाद म्हणून एक रुपयाचे नाणे मागून घ्या. तृतीयपंथींनी दिलेलं एक रुपयाचं नाणे तुम्ही जिथे पैसे ठेवता तिथे ठेवा. तुमच्या पाकिट, पर्समध्ये ठेवा. असे केल्यास काही दिवसांनी तुम्हाला तुमच्या आर्थिक स्थितीत चमत्कारिक बदल झालेले दिसेल. यामुळे तुमची दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट प्रगती होईल.