पूजा करताना स्टीलच्या भांड्यांचा वापर करणे शुभ की अशुभ?
हिंदू धर्मानुसार, स्टीलच्या भांड्याचा पूजा करताना वापर करणे योग्य की अयोग्य. शास्त्र काय सांगत...
हिंदू धर्मात, प्रत्येक व्यक्ती आपल्या घरात एक लहान मंदिर उभारतं. जे त्याच्या आस्थेचं एक ठिकाण असतं. जेथे ते नियमितपणे आपल्या देवतेचे ध्यान करू शकतात. पूजेमध्ये विविध धातूंच्या अनेक वस्तू आणि भांडी वापरली जातात. त्यामुळे पूजेशी संबंधित प्रत्येक गोष्टीची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. हिंदू धर्मग्रंथांनुसार, पूजेमध्ये वापरण्यात येणारी प्रत्येक गोष्ट अत्यंत शुद्ध आणि पवित्र असावी. त्यामुळे पूजेत तुम्ही कोणती धातूची भांडी वापरत आहात हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. बहुतेक लोक रोजच्या पूजेत स्टीलची भांडी वापरतात, पण स्टीलची भांडी वापरणे योग्य मानले जात नाही. यामागचं कारण अत्यंत महत्त्वाचं आहे. पूजा करताना स्टीलच्या भांड्यांचा वापर का करू नये हे समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे.
पूजेत या धातूची भांडी वापरू नका
पूजेमध्ये वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या धातूंनुसार फळ मिळते, असे मानले जाते. पूजेच्या विधीमध्ये स्टील, लोखंड आणि ॲल्युमिनियमची बनलेली भांडी अशुभ मानली जातात, यासोबतच या धातूपासून बनवलेल्या देवदेवतांच्या मूर्तीही पूजेसाठी शुभ मानल्या जात नाहीत. त्यामुळे पूजा करताना किंवा देवाची मूर्ती खरेदी करताना याची काळजी घ्यावी.
का वापरू नही हे धातू?
पूजेत या धातूंचा वापर न करण्यामागचे कारण म्हणजे नैसर्गिक धातू पूजेसाठी शुभ मानले जातात. स्टील हा मानवनिर्मित धातू असला तरी लोखंडाला गंज लागतो. त्यामुळे या धातूंना पूजेला योग्य मानले जात नाही. याशिवाय ॲल्युमिनियम धातूपासूनही काजळी बाहेर येते. त्यामुळे या धातूंचा वापर योग्य मानला जात नाही.
ही धातूची भांडी पूजेत वापरावीत
पूजेमध्ये सोने, चांदी, पितळ आणि तांब्याची भांडी वापरणे योग्य मानले जाते. यामागचे कारण असे की हे सर्व धातू नैसर्गिकरित्या सापडतात. याशिवाय त्यांच्या वापराने कोणतीही हानी होत नाही आणि जलाभिषेकानेच या धातूंची शुद्धी होते असाही समज आहे. सोन्या-चांदीचा धातू वापरता येत नसेल तर पितळ किंवा तांब्याचा वापर करावा.
ज्योतिषशास्त्र काय म्हणतं?
ज्योतिषशास्त्रानुसार, पूजा करताना पावित्र्य राखणे तितकेच गरजेचे आहे. स्टीलच्या भांड्यात तेवढी शुद्धता नसते त्यामुळे देवपूजेकरता ही भांडी वापरु नये.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)