Nag Panchami 2024 : श्रावण हा महिना सण उत्सवाचा असतो. नागपंचमी या सणाने उत्सवाला सुरुवात होते. श्रावण शुद्ध पंचमीला महिला उपवास करतात आणि नागाची पूजा करता. श्रावण हा महिना महादेव शंकराला समर्पित आहे. त्यामुळे या महिन्यात महादेवाची पूजा करण्यात येते. त्यासोबत महादेवाचा लाडका नागदेवताच्या पूजेलाही विशेष महत्त्व आहे. पण नागपंचमीला महिलांनी नागाची पूजा आणि उपवास का करावा? यामागील आख्यायिका तुम्हाला माहितीये का? (Why women should worship Nag on Nag Panchami nag panchami katha in marathi)


नागपंचमी का साजरी करतात?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदू धर्मात प्रत्येक सणामागे शास्त्र आणि पौराणिक कथा सांगण्यात आलीय. अगदी आपल्या सणांमागे धार्मिक तर आहेच सोबत त्यामागे वैज्ञानिक कारणही आहे. नागपंचमीमागे वैज्ञानिक कारण म्हणजे नाग हा शेतकऱ्यांचा मित्र मानला जातो. कारण तो शेतकऱ्यांना अनेक प्रकारे मदतीस पडतो. नागाचा बिळामुळे जमीन भुसभुशीत राहते. तर साप हे उंदीर खातात त्यामुळे धान्याचं नुकसान होतं नाही. त्यामुळे सापाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नागपंचमी साजरी करण्यात येते. 


महिलांनी नागपंचमीला नागाची पूजा का करावा? 


आता धर्मशास्त्रात महिलांनी नागपंचमीला नागाची पूजा का करावी, यामागे एक कथा सांगण्यात आलीय. 5 युगांपूर्वी सत्येश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. तिचा भाऊ सत्येश्वर याचा नागपंचमीच्या आदल्या दिवशी म्हणजे श्रावण शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला मृत्यू झाला होता. भावाच्या मृत्यूमुळे देवीने अन्नाचा त्याग केला होता. त्यानंतर सत्येश्वरीला श्रावण शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला सत्येश्वरने नागरुपात देवाला दर्शन दिले. 


हेसुद्धा वाचा - Nag Panchami 2024: नागपंचमीमधून आपली संस्कृती आपणास काय सांगते? तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या


तेव्हा देवीने नागालाच आपला भाऊ मानलं. तेव्हा नागदेवतेने दिला वचन दिले ज्या बहिणी माझा भाऊ म्हणून पूजा करतील. तिचं रक्षण मी सदैव करेल. तेव्हापासून श्रावण शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला म्हणजे नागपंचमीला महिला नागाची पूजा करतात. त्यामुले नागपंचमीला प्रत्येक बहीण नागाची भाऊ म्हणून पूजा करुन नागपंचमी साजरी करते. 


हेसुद्धा वाचा - Nag Panchami Wishes in Marathi : नागपंचमीनिमित्त मराठमोळ्या शुभेच्छा शेअर करून साजरा करा श्रावणातील पहिला सण


धर्मात असं मानलं गेलं आहे की, यादिवशी नागाची पूजा केल्यास कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते आणि सर्पदंशाची भीती नसते अशी श्रद्धा आहे. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)