बायकोच्या पायांवरही असतात नवऱ्याच्या भविष्याचे निशाण...
बऱ्याच गोष्टी आजच्या विज्ञान युगात मनास पटणाऱ्या नसतात. पण, अनेकांचा त्यावर आजही विश्वास बसतो. जसे की, म्हणे बायकोच्या पायांमध्येही दडलेले असते नवऱ्याच्या भविष्याचे रहस्य. काय आहे हा प्रकार घ्या जाणून....
मुंबई : मानवी शरीर म्हणजे निसर्गाचा अद्भूत अविष्कार. या शरीराबाबत शास्त्र, पुराणे आणि अनेक ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. यातील बऱ्याच गोष्टी आजच्या विज्ञान युगात मनास पटणाऱ्या नसतात. पण, अनेकांचा त्यावर आजही विश्वास बसतो. जसे की, म्हणे बायकोच्या पायांमध्येही दडलेले असते नवऱ्याच्या भविष्याचे रहस्य. काय आहे हा प्रकार घ्या जाणून....
अनेक शास्त्रांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सामुद्रिक शास्त्रात मानवी चेहऱ्याचे हावभाव, अवयवांची ठेवण आदी गोष्टींवर सखोल चर्चा केली आहे. यात स्त्रीचे पाय आणि तिच्या नवऱ्याचे भविष्य याबाबतही काही गोष्टी सांगितल्या आहेत. त्यातील काही पुढील प्रमाणे...
- प्रत्येक महिलेच्या पायावर काही खास खुणा असतात. ज्या त्यांच्या पतिच्या उज्ज्वल भविष्याचे संकेत देतात. याशिवाय पायांचे आकारही त्या जोडप्याचे वैवाहीक जीवन कसे असे याचे संकेत देतात. पुराणानुसार पती आणि पत्नला एकमेकांना पुरक मानतात. त्यामुळे दोघांच्याही शरीरावर असलेल्या काही खुणा, निशाण एकमेकांवर परिणामकारक ठरतात.
- शास्त्रानुसार जर एखाद्या स्त्रीच्या पायाच्या तळव्यावर चक्र, ध्वज किंवा स्वस्तिकाचे निशाण असेल तर, तीच्यासोबत विवाह करणारा पुरूष अत्यंत सुखी (राजासारख) आयुष्य जगतो. त्याला लक्ष्मीचे वरदान लाभते.
- ज्या महिलांच्या पायाच्या तळव्याच्या मध्यावर काही रेषा बोटांच्या बाजूने वरच्या दिशेला जात असतील तर ते त्या स्त्रीच्या पतीसाठी अत्यंत शुभ असते. अशी स्त्री ही पतीला समर्पीत आयुष्य जगते. त्यालाही आयुष्यात सुख लाभते.
- शास्त्रात म्हटले आहे की, जर एखाद्या स्त्रीच्या पायाचे अंगठ्याजवळचे बोट ज्याला तर्जनी असेही म्हणतात, ते जर पायाच्या इतर बोटांच्या तुलनेत मोठे असेल तर अशी स्त्री पतीच्या खांद्याला खांदा लाऊन संसार रेटते. जीवानातील कोणत्याही प्रसंगात ती त्याच्यासोबत खंबीरपणे उभी राहते. अनेकदा विचित्र, अनपेक्षीत गोष्टीत तिचा पतीला फार मोठा पाठिंबा मिळतो.
- जर एखाद्या स्त्रीच्या पायाच्या तळव्यावर कमळासारखे किंवा छत्रीसारखे निशाण असेल तर, संबंधीत स्त्रीचा पती राकारणात नाव कमावतो. त्याला समाजात मान-सन्मान मिळतो. तसेच, त्याला प्रसिद्धी आणि समृद्धीचीही साध मिळते.