Rudraksha Benefits in Marathi :  आज काल अनेकांच्या गळात किंवा हातात रुद्राक्षाची माळ दिसते. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार रुद्राक्ष धारण केल्यामुळे आयुष्यातील सर्व संकटं दूर होतात अशी मान्यता आहे. पण तुम्हाला रुद्राक्षचे फायदे आणि त्यांचे प्रकार माहिती आहे का? शिवमहापुराणात एकूण 16 प्रकारच्या रुद्राक्षांचं वर्णन करण्यात आलंय. (You will be speechless knowing the types of Rudraksha and its benefits astro news in marathi)


रुद्राक्षचे प्रकार आणि फायदे !


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. एक मुखी रुद्राक्ष -  या रुद्राक्षची प्रमुख देवता भगवान शंकर असून पैसा, यश आणि ध्यानासाठी हे धारण केलं जातं. तर ग्रह सूर्य असून राशी सिंह आहे.


2. दोन मुखी रुद्राक्ष - या रुद्राक्षची प्रमुख देवता भगवान अर्धनारीश्वर आहे. ग्रह चंद्र तर कर्क राशीचा हा रुद्राक्ष धारण केल्यामुळे आत्मविश्‍वास वाढतो आणि मनःशांतीसाठी प्राप्त होते. 


3. तीन मुखी रुद्राक्ष - या रुद्राक्षची देवता ही अग्निदेव असून ग्रह हा मंगळ तर राशी मेष आणि वृश्चिक आहे. हे रुद्राक्ष धोरण्यास केल्यास मनाच्या शुद्धीता होते आणि आयुष्य निरोगी राहतं. 


4. चार मुखी रुद्राक्ष - हे मानसिक क्षमता, एकाग्रता आणि सर्जनशीलतेसाठी घातल जातं. त्याची देवता ब्रह्मदेव, ग्रह-बुध असून राशी मिथुन आणि कन्या आहे. 


 5. पाच मुखी रुद्राक्ष - प्रमुख देवता भगवान कालाग्नी रुद्र, ग्रह गुरु असतो आणि धनु, मीन ही त्याची रास आहे. तर ध्यान आणि आध्यात्मिक कार्यासाठी ते धारण करतात. 


6. सहा मुखी रुद्राक्ष -  प्रमुख देवता भगवान कार्तिकेय असून शुक्र ग्रह आणि राशी तूळ आणि वृषभ आहेत. तर ज्ञान, बुद्धिमत्ता, संवाद कौशल्य आणि आत्मविश्वास हे धारण करतात.


7. सात मुखी रुद्राक्ष -  देवता माता महालक्ष्मी, शनि ग्रह आणि राशी मकर आणि कुंभ आहे. तर हे आर्थिक आणि करिअरच्या विकासासाठी धारण करण्यात येतो. 


8. आठ मुखी रुद्राक्ष - प्रमुख देवता भगवान गणेश असून ग्रह राहू आहे. करिअरमधील अडथळे आणि अडचणी दूर करण्यासाठी हे धारण करतात. 


 9. नऊ मुखी रुद्राक्ष - देवता देवी दुर्गा आहे आणि ग्रह केतू आहे. ऊर्जा, सामर्थ्य, धैर्य आणि निर्भयता मिळविण्यासाठी हे धारण करतात. 


10. दहा मुखी रुद्राक्ष - या रुद्राक्षाची देवता भगवान विष्णू आहे. नकारात्मक शक्ती, वाईट नजर आणि वास्तू आणि कायदेशीर बाबींपासून संरक्षणासाठी हे घेतलं जातं.


11. अकरा मुखी रुद्राक्ष - या रुद्राक्षाची देवता हनुमंत असून मंगळ ग्रह आणि राशी मेष आणि वृश्चिक आहेत. प्रवासादरम्यान आत्मविश्वास, निर्णय क्षमता, रागावर नियंत्रण आणि नकारात्मक ऊर्जांपासून संरक्षण करण्यासाठी धारण करतात.


12. बारा मुखी रुद्राक्ष - हे नाव, कीर्ती, यश, प्रशासकीय कौशल्य आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी धारण करतात. त्याची देवता सूर्यदेव, ग्रह-सूर्य आणि राशी सिंह आहे. 


13. तेरा मुखी रुद्राक्ष - या रुद्राक्षाची देवता इंद्रदेव, शुक्र ग्रह आणि राशी तूळ आणि वृषभ असणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी, आकर्षकता आणि तेज वाढवण्यासाठी धारण करतात. 


14. चौदा मुखी रुद्राक्ष - या रुद्राक्षाची देवता भगवान शिव, शनि ग्रह आणि राशी मकर आणि कुंभ आहे. सहाव्या इंद्रियांना जागृत करण्यासाठी आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता प्रदान करण्याच्या उद्देशाने धारण करण्यात येते.


15. गणेश रुद्राक्ष - देवता गणेश असून हे ज्ञान, बुद्धिमत्ता आणि एकाग्रता वाढीसाठी, सर्व क्षेत्रात यश मिळवण्यासाठी आणि केतूचा अशुभ प्रभाव टाळण्यासाठी परिधान करण्यात येते. 


16. गौरी शंकर रुद्राक्ष - या रुद्राक्षाची देवता भगवान शिव-पार्वती, ग्रह-चंद्र आणि कर्क राशी आहेत. कुटुंबात सुख-शांती, लग्नात विलंब, संतान आणि मानसिक शांती यासाठी धारण करण्यात येते.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)