मुंबई : हातावरुन भविष्य सांगण्याची परंपरा तशी जूनीच. हे शास्त्र ही फार जूने. पण त्यावरुन व्यक्तीचा स्वभाव, भविष्याचा तर्क लावला जातो. हाताच्या अंगठ्याच्या बाजूच्या बोटाला तर्जनी असे म्हणतात. हस्तरेखा विज्ञानात त्याला गुरूचे बोट म्हटले जाते. या बोटावरुन व्यक्तीच्या गुरु ग्रहाची स्थिती समजते. गुरुच्या या बोटावरून व्यक्तीच्या धन, भाग्य, मान-सन्मान आणि पद प्रतिष्ठा याची माहिती मिळते. तर पाहुया तुमचे हे बोट तुमच्या भविष्याबदद्ल काय सांगते.


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    हस्तरेखा विज्ञानानुसार, तर्जनी मधल्या बोटापेक्षा मोठे असल्यास ती व्यक्ती भाग्यशाली असते. अशा व्यक्तीला मान-सन्मान आणि प्रतिष्ठा प्राप्त होते.

  • तर्जनी अनामिकेच्या (मधल्या बोटाच्या बाजूचे बोट) उंचीइतकी असल्यास त्या व्यक्ती इमानदार आणि कर्तव्यनिष्ठ असतात. ते इतरांची मदत करण्यास नेहमी तयार असतात. हे काम जे लोक करतात त्यात ते यश मिळवतात. त्यांच्या स्वभावामुळे त्यांना आयुष्यात सफलता मिळते.

  • ज्यांची तर्जनी अनामिकेपेक्षा लहान असते ते निराशवादी असतात. मात्र आपले ध्येय साध्य करण्याचा ते सर्वोतोपरी प्रयत्न करतात.

  • तर्जनी थोडी अंगठ्याच्या बाजूला झुकणारी असल्यास अशा व्यक्ती खूप महत्त्वाकांक्षी आणि दृढ इच्छाशक्ती असणारे असतात. अशा व्यक्ती जे ठरवतात ते करतात. त्यामुळे त्यांना आयुष्यात इच्छेनुसार सारे काही मिळते. 

  • ज्यांच्या हाताची तर्जनी मधल्या बोटाकडे झुकते त्यांची मानसिकता कमजोर असते. ते साहस करण्यास धजावत नाहीत. हे त्यांच्या असफलतेचे मोठे कारण आहे.