या राशीच्या लोकांना प्रेमासाठी करावा लागतो संघर्ष, पाहा तुमची रास आहे का?
या राशीच्या लोकांना सहजा सहजी मिळत नाही खरं प्रेम, पाहा तुमची रास तर नाही?
मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार, कोणत्याही व्यक्तीला चांगले जाणून घेण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी, त्याची राशीचक्र पुरेसे आहे. राशीच्या आधारे व्यक्तीचे भविष्य, यश-अपयश इत्यादी गोष्टी कळू शकतात.
एवढेच नाही तर त्या व्यक्तीला खरे प्रेम मिळेल की नाही किंवा कोणत्या वयात माणसाला खरे प्रेम मिळेल. राशिचक्रांवरूनही हे सहज ओळखता येते. आज आपण अशा राशींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांना खरे प्रेम मिळवण्यासाठी खूप जास्त संघर्ष करावा लागतो.
कुंभ : या राशीचा स्वामी ग्रह शनि देव आहे. या राशीच्या लोकांचा स्वभाव थोडा रागीट असतो. या राशीच्या लोकांच्या कुंडलीत जेव्हा शनी अशुभ स्थानी असतो तेव्हा प्रेमात त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो. खरं प्रेम मिळवण्यासाठी खूप जास्त संघर्ष करावा लागतो.
तुळ: या राशीचा स्वामी शुक्र आहे. या राशीच्या लोकांना नियम आणि कायद्यानुसार चालायला खूप जास्त आवडतं. त्यामुळे प्रेमात त्यांना मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो.
मकर : या राशीच्या व्यक्तींना प्रेमात संघर्ष करावा लागतो. शनी अशुभ स्थानी असल्याने या राशीच्या व्यक्तींना त्रास सहन करावा लागतो. खऱ्या प्रेमापासून ते वंचित राहतात. त्यांना प्रेम मिळवणं कठीण होतं. चुकीच्या लोकांच्या संगतीचा वाईट परिणाम होऊ शकतो.
(Disclaimer: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे. अधिक बातम्यांसाठी फॉलो करा 24 Tass.com )