मुंबई : ज्योतिषशास्त्रात प्रत्येक राशीचे स्वतःचं गुण आणि तोटे असतात. काही लोक स्वभावाने खूप शांत आणि विनम्र असतात, तर काही रागवतात. प्रत्येक राशीचं स्वरूप वेगळं असतं. अशा काही राशींचे लोक स्वभावाने हट्टी असतात. हे लोक कोणाचंच ऐकत नाहीत. फक्त आपल्या मनाचं खरं करतात. कोणत्याही परिस्थितीत जिंकणं हेच या लोकांचं ध्येय असतं. 


तूळ 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या राशीच्या व्यक्ती कठोर परिश्रम करण्यापासून मागे हटत नाहीत. ते स्वभावाने खूप मेहनती आहेत. या लोकांना जिंकण्याची जिद्द असते. शिवाय या व्यक्तींचा हा स्वभाव माणसाला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जातो. त्यांना स्वतःचं काम करायला आवडतं. एकदा का त्यांनी एखादं काम एकदाच करायचं ठरवणारे हे लोक ते काम पूर्ण केल्यावरच ते शांत होतात.


मेष 


हे लोक स्वभावाने फार आक्रमक असतात. हे लोक जिंकण्यासाठी काहीही करतात. ज्योतिषांच्या मते, जर या लोकांनी आपल्या हट्टी स्वभावाचा योग्य ठिकाणी वापर केला तर ते प्रत्येक कामात विजयी होतात.


वृषभ


या राशीच्या व्यक्तींचा इरादा पक्का असतो. जे काम करण्याची जिद्द मिळते, ते काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करूनच ते शांत होतात. या व्यक्ती ध्येय साध्य करण्यासाठी खूप मेहनत करतात. ते कशाशीही तडजोड करायला तयार नसतात. अनेकदा या कारणामुळे त्यांना अनेक वेळा नुकसानंही सहन करावं लागतं. हे लोक पराभव सहन करू शकत नाहीत.


(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)