काठमांडू : दक्षिण आशियाई ज्युडो चॅम्पियशिपमध्ये भारतानं दहा सुवर्णपदक आणि तीन कांस्य पदकांची लयलूट केली आहे. यामध्ये सात महिला तर तीन पुरुष खेळाडूंनी सुवर्णपदक पटकावलय. आठव्या दक्षिण आशियाई ज्युडो चॅम्पियनशिपमध्ये भारतानं पुन्हा एकदा आपलं वर्चस्व कायम राखलं आहे. भारताकडून सुशिला देवी, कल्पना देवी थौऊदाम, अनिता चाऩू, सुनिबाला देवी अशा दिग्गज खेळाडूंनी सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. 


सर्वाधिक पदकांसह भारता अव्वल स्थानी आहे. तर नेपाळनं 21 पदकांसह दुस-या, पाकिस्तान 8 पदांकसह तिस-या, श्रीलंका 8 पदकांसह चौथ्या आणि चार पदकांसह बांग्लादेश पाचव्या स्थानी आहे. तर भुतान केवळ एकच पदक जिंकू शकला आहे.