१००, २०० नव्हे तर तब्बल १३०० टक्क्यांनी वाढला या खेळाडूचा पगार
सुप्रीम कोर्टाने गठीत केलेल्या कमिटीने बुधवारी खेळाडूंना करारानुसार मिळणाऱ्या पगाराबाबत घोषणा केली आहे.
मुंबई : सुप्रीम कोर्टाने गठीत केलेल्या कमिटीने बुधवारी खेळाडूंना करारानुसार मिळणाऱ्या पगाराबाबत घोषणा केली आहे.
टीम इंडियाला आता एका वर्षासाठी ग्रेडनुसार पगार दिला जाणार आहे. बीसीसीआयने A+ ही नवीन ग्रेड वाढवली आहे. A+, A,B आणि C अशा 4 कॅटेगरी करण्यात आल्या आहेत.
अनेक खेळाडुंना याचा मोठा फायदा झाला आहे. अनेक खेळाडूंच्या पगारामध्ये घशघशीत वाढ झाली आहे. यामध्ये शिखर धवन पहिल्या स्थानावर आहे. शिखर धवनच्या पगारात तब्बल 1300 टक्के वाढ झाली आहे.
पाहा कोणाच्या पगारात किती वाढ
शिखर धवन - 1300
रोहित शर्मा - 600
भुवनेश्वर कुमार - 600
जसप्रीत बुमराह - 600
आर अश्विन - 150
रविंद्र जडेजा - 150
चेतेश्वर पुजारा - 150
अजिंक्य राहाणे - 150