मुंबई : क्रिकेट विश्वात दररोज कुठला तरी नवा रेकॉर्ड झाल्याचं ऐकायला मिळतं. मात्र, मुंबईतील एका १६ वर्षीय तरुणीने एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट टीमचा हिस्सा असलेली मुंबईतील १६ वर्षीय जेमिमा रॉड्रिग्सने डबल सेंच्युरी करत सर्वांची मनं जिंकली. औरंगाबादमध्ये झालेल्या मॅचमध्ये जेमिमा रॉड्रिग्सने हा कारनामा केला आहे.


युवा स्टार जेमिमाह रॉड्रिग्सने मुंबईच्या टीमसाठी खेळताना सौराष्ट्र टीमच्या बॉलर्सची धुलाई करत १६३ बॉल्समध्ये नॉट आऊट २०२ रन्सची जबरदस्त इनिंग खेळली.


जेमिमाहने खेळलेल्या या शानदार इनिंगच्या जोरावर मुंबईच्या टीमने ३४७ रन्सचा डोंगर उभा केला. जेमिमाहने आतापर्यंत टूर्नामेंटमध्ये दोन सेंच्युरी केल्या आहेत.



१९ वर्षांखालील सुपर लीगमध्ये जेमिमाहची सरासरी ३०० हून अधिक आहे. जेमिमाहने १० मॅचेसमध्ये जवळपास ७०० रन्स केले आहेत.



जेमिमाह रॉड्रिग्सने पहिल्या ५२ बॉल्समध्ये ५३ रन्स बनवले आणि आपली हाफ सेंच्युरी पूर्ण केली. त्यानंतर ८३ बॉल्समध्ये आपली सेंच्युरी पूर्ण केली. मग, ११६ बॉल्समध्ये १५३ रन्सची इनिंग खेळली आणि शेवटी १६३ बॉल्समध्ये २०२ रन्सची नॉट आऊट इनिंग खेळली.


१९ वर्षांखालील महिला क्रिकेटमध्ये डबल सेंच्युरी करणारी जेमिमाह दुसरी प्लेअर ठरली आहे. यापूर्वी हा कारनामा स्मृती मंधानाने केला आहे. मंधानाने २०१३ मध्ये अंडर १९ क्रिकेटमध्ये २२४ रन्सची नॉट आऊट इनिंग खेळली होती.