मुंबई : भारताचे माजी क्रिकेटर कपिल देव राज्यसभेतून आपल्या नव्या इनिंगची सुरुवात करु शकतात. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि माजी क्रिकेटर कपिल देव यांच्यात भेट झाली. भाजपकडून कपिल देव राज्यसभेवर जाणार का याबाबत चर्चा सुरु झाल्य़ा आहेत. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी 1 जूनला कपिल देव यांची भेट घेतली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यसभेचे सदस्य म्हणून राष्ट्रपतींनी ज्या लोकांची निवड केली आहे त्यामध्ये कपिल देव यांचं नाव देखील आहे. त्यामुळे भाजपला विश्वास आहे की, कपिल देव हा प्रस्ताव नाकारणार नाहीत. 


फायनँशियल एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार याआधी देखील कपिल देव यांना राजकारणात येण्यासाठी अनेक पक्षांनी ऑफर दिली आहे. पण ते राजकारणापासून लांब राहणार आहेत. भारतीय जनता पक्ष आणि पंजाबच्या सिरोमणी अकाली दलाने देखील कपिल देव यांना 2014 च्या लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आमंत्रित केलं होतं. पण त्यांनी त्यासाठी नकार दिला होता. पण त्यांना राज्यसभेच्या सदस्यतेसाठी राष्ट्रपतींनी ऑफर केली तर त नाकारणार नाहीत. 


भाजपमध्ये जाणार सौरव गांगुली !


दुसरीकडे आणखी एक माजी क्रिकेटर सौरव गांगुली हा देखील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा आहेत. पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष आपली पकड मजबूत करण्यासाठी सौरभ गांगुलीला पक्षात घेतलं जावू शकतं. सध्या सौरव गांगुलीने ही गोष्ट नाकारली आहे.