मुंबई : आयपीएल 2021 चे उर्वरित सामने आता जवळ आले आहेत. यूएईमधील उर्वरित सामने 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत. पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होईल. निम्मी आयपीएल सामने आधीच झालेच आणि आता उरलेली आयपीएल सामने यूएईमध्ये होणार आहेत. दरम्यान, आयपीएल 2022 बद्दल देखील आता चर्चा सुरु झालीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

IPL 2022 मध्ये 8 नव्हे तर आता 10 संघ खेळणार आहेत. आयपीएल पुढील वर्षी म्हणजेच 2022 पासून सुरू होईल. यासाठी बीसीसीआयने नुकतीच निविदाही काढली होती. दरम्यान, आयपीएलच्या दोन संघांसाठी सहा स्पर्धक हजर झाल्याची बातमी समोर येत आहे. म्हणजेच सहा संघांपैकी कोणतेही दोन संघ सहभागी होऊ शकतात. 


मीडिया रिपोर्टमधून त्यांची नावेही समोर आली आहेत. आयपीएलच्या दोन नवीन संघांसाठी लखनौ आणि अहमदाबादची नावे बराच काळ चर्चेत होती. पण आता कळले आहे की या दोघांव्यतिरिक्त, गुवाहाटी, रांची, कटक आणि धर्मशाला यांचाही दावेदारांच्या यादीत समावेश आहे. या सहापैकी केवळ दोन नवीन संघ आयपीएलमध्ये सामील होऊ शकतात, अशी माहिती आहे. या दोन नवीन संघांसाठी लिलाव कधी होणार हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी बीसीसीआयने निविदा काढल्या आहेत आणि त्यासाठी नियम आणि अटीही जारी केल्या आहेत.


दोन नवीन टीम हिंदी भाषिक भागातील असतील. असे म्हणतात की हिंदी भाषिक भागातील बहुतेक लोक आयपीएल पाहतात. टीव्ही आणि मोबाईलचे रेटिंग देखील सांगते की आयपीएलची सर्वाधिक क्रेझ हिंदी भाषिक भागात आहे. गेल्या वर्षी हिंदी भाषिक प्रदेशांतील केवळ 65 टक्के लोकांनी आयपीएल पाहिली होती, त्यामुळे त्याच प्रदेशातील संघ आयपीएलमध्ये सामील होताना दिसतील. असे मानले जाते की आयपीएल संपल्यानंतर, नवीन संघांसाठी कधीही लिलाव होऊ शकतो. देशातील अनेक दिग्गज नवीन संघ खरेदी करण्यासाठी तयार बसले आहेत, त्यामुळे बोली खूप मोठी बोली लागण्याची शक्यता आहे.


आयपीएल 2022 10 संघांमध्ये होईल. पुन्हा एकदा आयपीएलचे स्वरूप वर्ष 2011 मध्ये परत येऊ शकते, जेव्हा पाच संघांचे दोन गट तयार झाले होते. कारण जर दहा संघांचे आयपीएल देखील या स्वरूपावर असेल तर संपूर्ण स्पर्धा सुमारे तीन महिन्यांची असेल. आयसीसीकडून इतका लांब वेळ मिळणे शक्य नाही.