जोहानिस्बर्ग : टेस्ट क्रिकेट असोवा प्रथम श्रेणीचे क्रिकेट त्रिशतक हे कायम चर्चेत राहिलेलं आहे. आणि 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तिसरे शतक सर्वात फास्ट असेल तर क्या बात है. सगळ्यात फास्ट त्रिशतक करण्यामध्ये विरेंद्र सेहवागचं नाव सर्वात पहिलं घेतलं जातं. टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात फास्ट त्रिशतक करणारा विरेंद्र सेहवाग हा खेळाडू ठरला आहे. सेहवागने २००७ - ०८ मध्ये चैन्नईत दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात २७८ बॉलमध्ये त्रिशतक केलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या मैथ्यू हेडनचा नंबर येतो. ज्याने ३६२ बॉलमध्ये त्रिशतक केले आहे. त्यानंतर पुन्हा तिसऱ्या नंबरवर विरेंद्र सेहवागने पाकिस्तानच्या विरूद्ध खेळताना ३६४ चेंडबच त्रिशतक केले. मात्र त्रिशतकात प्रथम श्रेणीचे क्रिकेट सर्वात पुढे आहे. 



मार्को मरॅसने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात फास्ट त्रिशतक करून विश्व रेकॉर्ड करणारे दक्षिण आफ्रिकेचे दुसरे खेळाडू बनले आहे. २४ वर्षीय मरॅसने दक्षिण आफ्रिकेच्या तीन दिवसीय प्रांतीय  खेळात सुरूवातीला लंडनमध्ये बॉर्डरकडून खेळत असेल. इस्टर्न प्रोविंसच्या विरोधात १९१ चेंडूत नाबाद ३०० धावा केल्या. या अगोदर सर्वात फास्ट त्रिशतक हे १९२१ मध्ये चार्ली मॅकार्टनीने २२१ चेंडू खेळले आहेत. त्याने नॉटिंघमशायरच्या विरोधात त्रिशतक केले आहे. 


या खेळाडूने रचला हा विक्रम


आपल्या रेकॉर्डच्या वेळी मरॅस जेव्हा खेळण्यासाठी मैदानावर उतरला तेव्हा त्याची टीम ८२ वर चार विकेट गमावून संकटात होती. त्यानंतर त्याने मॅचमध्ये ३५ चौके आणि १३ छक्के मारून सामना वर आणला. या दरम्यान मरॅसने ब्रेडले विलियम्स जो की ११३ नाबाद होता त्याच्यासोबत ४२८ धावा केल्या. हा सामना पावसात असल्यामुळे ड्रॉ झाली. मरॅसने या सामन्यात पहिल्या दिवशी ६८ चेंडून १०० रन केले त्यानंतर दुसऱ्या दिवशी ७१ चेंडूक शतक पूर्ण केले आणि तिसऱ्या दिवशी ५२ चेंडूत सेंच्युरी आणि आपले त्रिशतक पूर्ण केले. 


असं म्हटलं जातं की, जगात फक्त ४ क्रिकेट असे आहे ज्यांनी आपल्या करिअरमध्ये दोन दोन त्रिशतक केले आहेत. या एलीट क्लबमध्ये सर डॉन ब्रॅडमॅन, विरेंद्र सेहवाग, ब्रायन लारा आणि क्रिस गेलचा समावेश आहे. वर्ल्ड क्रिकेटमध्ये २४ खेळाडूंच्या नावावर २८ त्रिशतक आहे. यामध्ये २ त्रिशतक हे सेहवागच्या नावावर आहे.