कोलकाता : कोलकात्याविरुद्धच्या मॅचमध्ये चेन्नईचा ५ विकेटनी विजय झाला आहे. या मॅचमध्ये चेन्नईने टॉस जिंकून कोलकात्याला बॅटिंगसाठी बोलावले. मॅचदरम्यान पहिल्या इनिंगमध्ये चेन्नईच्या फॅफ ड्यू प्लेसिसने एक रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. एका इनिंग मध्ये सर्वाधिक कॅच घेण्याचा रेकॉर्ड त्याने केला आहे. याआधी अशा प्रकारचा रेकॉर्ड पाच खेळाडूंनी केला आहे. यामुळे प्लेसिस हा सहावा खेळाडू ठरला आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


दिनेश कार्तिकची कॅच घेत डुप्लेसिसने हा रेकॉर्ड केला आहे. फॅफ ड्यू प्लेसिसने कोलकात्याविरुद्धच्या मॅचमध्ये सुनील नारायण, नितीश राणा, रॉबिन उथप्पा आणि दिनेश कार्तिक यांचे कॅच घेतले. ड्यू प्लेसिसने रॉबिन उथप्पाचा घेतलेला कॅच हा कठीण होता. डुप्लेसिसने उडी मारुन अशक्य वाटत असलेली कॅच टिपला. तसेच विजयी आव्हानाचे पाठलाग करताना त्याने २४ रनची उपयोगी खेळी केली आहे.    


एका मॅचमध्ये चार कॅच घेण्याचा असाच रेकॉर्ड २००८ साली मुंबईच्या सचिन तेंडुलकरने केला होता. विशेष म्हणजे हा रेकॉर्ड देखील कोलकात्याविरुद्ध केला होता. यानंतर आयपीएलच्या तिसऱ्या हंगामात म्हणजेच २०१० साली डेविड वॉर्नरने हा रेकॉर्ड केला होता. वॉर्नरने दिल्लीविरुद्ध खेळताना ४ कॅच घेतले होते.


आयपीएल मध्ये कोलकात्याकडून खेळणाऱ्या जॅक कॅलिसने ही असा कारनामा २०११ साली केला आहे. दिल्लीविरुद्ध खेळण्यात आलेल्या मॅचमध्ये ४ कॅच पकडून युवा खेळाडूंसमोर एक आदर्शच ठेवला होता.


याशिवाय यंदाच्या आयपीएलच्या १२ व्या पर्वात फॅफ डुप्लेसिसच्या आधी २  खेळाडूंनी एका मॅचमध्ये ४ कॅच घेण्याची कामगिरी केली आहे. यामध्ये राहुल तेवतिया, डेविड मिलरचा समावेश आहे. दिल्लीकडून खेळणाऱ्या राहुल तेवतियाने मुंबईविरुद्ध खेळताना तर डेविड मिलरने पंजाबसाठी खेळताना मुंबईविरुद्ध ४ कॅच घेतले होते.