मुंबई : आज क्रिकेटमध्ये अनेक नियम बदलले आहेत. क्रिकेट जेव्हापासून सुरु झालं त्यानंतर त्यात अनेक बदल होत गेले. ओव्हर्सपासून कपड्यांपर्यंत सगळंच काही बदललं. क्रिकेट चाहत्यांना देखील आज अनेक नियम सहज माहित असतात. वेळेनुसार ते बदलतात. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात क्रिकेट फॅन्स आहेत. पण अनेकांना ही गोष्ट माहित नसेल की कोणी करिअरमध्ये एकही नो बॉल टाकला नाही. आज आम्ही तुम्हाला अशा काही दिग्गज खेळाडूंबद्दल सांगणार आहोत ज्यांनी आपल्या करिअरमध्ये कधीच नो बॉल टाकला नाही.


पाहा कोण आहेत ते ५ खेळाडू.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

५. लांस गिब्स - वेस्टइंडिजच्या या खेळाडूने ७९ टेस्ट सामने आणि ३ वनडे सामने खेळले आहेत. पण या दरम्यान या गोलंदाजाने एकही नो बॉल टाकला नाही.


४. डेनिस लिली - ऑस्ट्रेलियाच्या या शानदार गोलंदाजाने ७० टेस्ट सामने खेळले आहेत. पण या गोलंदाजाने एकदाही नो बॉल टाकला नाही.


३. इमरान खान - पाकिस्तान टीमचा माजी कर्णधार आणि सध्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी ८८ टेस्ट सामने आणि १७५ वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी कधीही एकही नो बॉल टाकला नाही. 


२. इयान बॉथम - इंग्लंडचे फास्ट बॉलर इयान याने १६ वर्षाच्या इतक्या मोठ्या करिअरमध्ये कधीच नो बॉल टाकला नाही. इयान यांनी १०२ टेस्ट आणि ११६ वनडे सामने खेळले आहेत.


१. ट्रुमॅन एफेस : इग्लंडच्या ट्रुमॅन यांनी देखील ६७ टेस्ट सामन्यांमध्ये एकही नो बॉल टाकला नाही.