मुंबई : भारतीय क्रिकेटमधील युवा क्रिकेटर मुंबईचा फलंदाज पृथ्वी शॉ सध्या विक्रमांचे नवनवे इमले रचतोय. त्याची तुलना तर भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरशी होऊ लागलीये. त्याचे वय आहे केवळ १८ वर्षे. मात्र इतक्या लहान वयात तो नवनवीन रेकॉर्ड करतोय.


आंध्रप्रदेशविरुद्धच्या सामन्यात नवा रेकॉर्ड


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रणजीत आंध्रप्रदेशविरुद्धच्या सामन्यात शुक्रवारी पृथ्वी शॉने आणखी एक विक्रम आपल्या नावे केला. पृथ्वीने आंध्रप्रदेशविरुद्ध रणजी सामन्यात दमदार शतक लगावले. त्याने सिद्धेश लाडच्या साथीने २२४ चेंडूत ११२ धावा केल्या. यासोबतच १८व्या वर्षात केवळ ७ सामन्यांत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ५ शतके लगावण्याचा विक्रम केलाय. यातील त्याची ४ शतकेही रणजी स्पर्धेतील आहेत. 


सचिननंतर दुसरा क्रिकेटर


रणजीमध्ये या वयात सर्वाधिक शतके लगावणारा तो पहिला क्रिकेटर ठरलाय. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांच्या यादीत तो दुसऱ्या स्थानी आहे. त्याच्या आधी सचिन तेंडुलकर आहे. सचिनने या वयात प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ७ शतके ठोकली होती. 


पृथ्वीच्या फलंजीबाबत बोलायचे झाल्यास गेल्या ७ सामन्यांत त्याने ५०हून अधिक धावा केल्यात.