50 Over ODI World Cup: गेल्या अनेक दिवसांपासून क्रिकेटमध्ये (Cricket News) नवीन फॉरमॅट येतोय का? एकदिवसीय क्रिकेटमध्ये बदल होणार आहे का? आता एकदिवसीय सामने 40 ओव्हरचे होणार का? असे सवाल उपस्थित होताना दिसत आहे. त्याला कारण ठरतंय टीम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचं एक वक्तव्य. (50 over odi world cup will be the last time in 2023 new format of cricket going to come sports news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी म्हटलंय की, वनडे फॉरमॅट जिवंत ठेवण्यासाठी त्यात बदल करणे आवश्यक आहे. रवी शास्त्री यांच्या वक्तव्याला भारताचा विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याने देखील सहमती दर्शविली आहे.


40 ओव्हरचा सामना... काय म्हणाले Ravi Shastri ?


आम्ही 1983 मध्ये जेव्हा वर्ल्ड कप जिंकला तेव्हा तो 60 षटकांचा खेळ होता. मग लोकांचा कल कमी झाला, मग 50 ओव्हर खेळवली जाऊ लागली. मला वाटतं की आता 40 ओव्हरचा खेळ होण्याची वेळ आली आहे. काळाबरोबर गोष्टी विकसित होतात. क्रिकेटचं हे स्वरूप कमी करण्याची गरज आहे, असं मत रवी शास्त्री यांनी (Ravi Shastri On ODI World Cup) व्यक्त करून दाखवलं आहे.


ही गोष्ट खरी आहे की, कसोटी क्रिकेटला सर्वाधिक महत्त्व दिले पाहिजे. माझ्या मते भारतात सर्व फॉरमॅटसाठी जागा आहे. जगभरात अनेक देशांतर्गत लीग आहेत ज्यामध्ये T20 खेळाला प्रोत्साहन दिलं जातं. आपण त्या लीग होऊ द्यायला हव्यात आणि त्यादरम्यान विश्वचषक व्हायला हवा, असं मत देखील रवी शास्त्री यांनी व्यक्त केलंय.


काय म्हणाला DK ?


लोकांना 7 तास बसून सामना बघायचा नाही. त्यामुळे कदाचित भारतात होणारा विश्वचषक शेवटच्या वेळी 50 षटकांचा खेळवला जाईल, असं मत दिनेश कार्तिकने नोंदवलं आहे. लोक मनोरंजनासाठी टी-ट्वेंटी पाहतात पण 50 षटकांचा खेळ कंटाळवाणा होऊ लागलाय, असंही डीके म्हणालाय.