बीसीसीआयचे सचिव जय शाह यांची आयसीसीचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. जय शाह हे येत्या डिसेंबर पासून आयसीसीच्या अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारतील. 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद आयसीसीने यापूर्वीच पाकिस्तानकडे सोपवलं आहे.  मात्र टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानला जाणार की नाही याबाबत अनेक प्रश्नचिन्ह आहेत. मात्र अशा परिस्थितीत पाकिस्तनाचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक राशिद लतीफ याने टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला येणार हे 50 टक्के कन्फर्म असल्याचं विधान केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागील अनेक दिवसांपासून ही चर्चा आहे की टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानला जाणार नाही. बीसीसीआयने यापूर्वीच सुरक्षेच्या कारणांमुळे टीम इंडियाला पाकिस्तानला पाठवण्यास  नकार दिला होता. आशिया कप 2023 मध्ये सुद्धा यजमानपद पाकिस्तानकडे होते, मात्र त्यावेळी बीसीसीआयने पाकिस्तानमध्ये टीम इंडियाला पाठवण्यास नकार दिला होता. त्यामुळे आशिया कपमध्ये भारताचे सर्व सामने हे श्रीलंकेत झाले. आता पुन्हा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचे सामने हे दुबई किंवा इतर देशांमध्ये खेळवण्यात यावेत अशी मागणी बीसीसीआयने केली होती. 


हेही वाचा : 'या' युवा खेळाडूला बनायचंय भारतीय बॅडमिंटनमधला विराट कोहली



मात्र या गोष्टी सुरु असताना पाकिस्तान टीमचे प्रशिक्षक राशिद लतीफ यांनी एका मुलाखतीत टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानला येणार असल्याचं 50 टक्के कन्फर्म आहे असं विधान केलंय.


 


काय म्हणाला राशिद लतीफ?


यूट्यूब चॅनेल Caught Behind वर बोलताना राशिद लतीफने सांगितले की, "यापूर्वी जय शाहंनी नेहमीच क्रिकेटच्या भल्यासाठी काम केले आहे आणि जेव्हा फक्त क्रिकेटचा विचार केला जातो तेव्हा त्यांचे कार्य अधिक चांगले होते. ते अतिशय मजबूत राजकीय पार्श्वभूमीतून आले आहेत आणि पाकिस्ताननेही त्यांना पाठिंबा दिला आहे. अशा परिस्थितीत या सर्व गोष्टी लक्षात घेता जय शाह आयसीसीचे अध्यक्ष बनल्यामुळे, भारतीय संघ आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 खेळण्यासाठी पाकिस्तानात येऊ शकतो हे आता 50 टक्के नक्की झाले आहे."