नवी दिल्ली : वादाच्या भोवऱ्यात अडकलेला इंग्लंडचा ऑल राऊंडर बेन स्टोक्स आणि भारताचा ऑफ स्पिनर आर. अश्विनचा २७ आणि २८ जानेवारीला बंगळूरुत होणाऱ्या आयपीएलच्या १६ मार्की खेळाडूंमध्ये समावेश आहे. 


लिलावात १६ मार्की खेळाडू


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुट यांताही १६ खेळाडूंमध्ये समावेश आहे. बुधवारी स्टोक्सला इंग्लंडकडून खेळण्याची परवानगी मिळाली. आहे. सप्टेंबरमध्ये नाईटक्लबबाहेर झालेल्या हाणामारीच्या घटनेत सहभागी असल्याच्या कारणावरुन इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्याला निलंबित केले होते. 


यंदाच्या होणाऱ्या आयपीएलमध्ये तब्बल ५७८ खेळाडूंचा लिलाव केला जाणार आहे. एक हजाराहून अधिक खेळाडूंनी रजिस्ट्रेशन केले होते. मात्र बीसीसीआयकडून ५७८ खेळाडूंना लिलावासाठी निवडण्यात आले. 


खेळाडूंना त्यांच्या प्रोफाईलच्या आधारावर आठ स्लॅबमध्ये ठेवण्यात आलेय. आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी करणाऱ्यांना दोन कोटी रुपये, दीड कोटी रुपये, एक कोटी रुपये, ७५ लाख आणि ५० लाख तसेच इतर अनकॅप खेळाडूंसाठी आधारमूल्य अनुक्रमे ४० लाख, ३० लाख आणि २० रुपये ठेवण्यात आलेय.


आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्लांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएलच्या लिलावात प्रत्येक क्रिकेटरला निवडण्यामागे मोठी रणनीती बनवलेली असते. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर मिचेल स्टार्क आणि टी-२० क्रिकेटर क्रिस गेलला मार्की खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानावर ठेवण्यात आलेय.


दोन कोटी रुपयांच्या स्लॅबमध्ये १३ भारतीय क्रिकेटर्सचा समावेश आहे. यात मुरली विजय, केदार जाधव, लोकेश राहुल, युझवेंद्र चहल आणि दिनेश कार्तिक हे क्रिकेटर सर्वाधिक पसंती दिल्या जाणाऱ्या खेळाडूंच्या यादीत समाविष्ट आहेत.