Riyan Prag Century: इमर्जिंग एशिया कप 2023 स्पर्धेसाठी (Emerging Asia Cup 2023) बीसीसीआयने नव्या छाव्यांना संधी दिली गेली होती. याचं नेतृत्व यश धुळ या युवा खेळाडूकडे देण्यात आलं होतं. तर साई सुदर्शन पासून रियान पराग (Riyan Prag) यांना संधी देण्यात आली होती. या स्पर्धेत टीम इंडियाचा पाकिस्तानकडून लाजीरवाणा पराभव झाला. पराभवानंतर ट्रोल झाला तो रियान पराग. रियानला या सिरीजमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. अशातच आता रियान परागने धमाकेदार शतक ठोकलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देवधर ट्रॉफीमध्ये (Deodhar Trophy)  खेळल्या जात असलेल्या सामन्यात युवा फलंदाज रियान परागने शानदार खेळी करत शतक झळकावलं. भारतात खेळल्या जाणाऱ्या देवधर ट्रॉफीमध्ये रियान परागने शानदार खेळी करत तमाम समीक्षकांना चपराक दिली आहे. रियान परागची चीनमध्ये खेळल्या जाणाऱ्या आशियाई क्रीडा 2023 मध्ये निवड झाली नाही, त्यामुळे आता त्याने सिलेक्टर्सला सडेतोड उत्तर दिल्याची चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहे.


रियान परागने ईस्ट झोन आणि नार्थ झोन यांच्यात सामना खेळवला गेला. या सामन्यात रियान परागने दमदार शतक ठोकलं, यावेळी त्याने 6 व्या क्रमांकावर खेळायला येत 11 गगनचुंबी सिक्स आणि 5 फोरच्या मदतीने धुंवाधार शतक ठोकलं. 102 बॉलचा सामना करत 128.43 च्या स्टाईक रेटने 131 धावांची खेळी केली. फक्त सिक्स आणि फोरच्या मदतीने रियागने 16 चेंडूत 86 धावा कुटल्या.


आणखी वाचा - हार्दिकसमोर कोहलीची माकडचेष्ठा, पांड्याला खिजवत विराटचा भन्नाट डान्स; पाहा Video


दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना ईस्ट झोन संघाने 50 षटकांत 8 गडी गमावून 337 धावा केल्या.  ईस्ट झोनकडून रियान परागशिवाय कुमार कुशाग्रानेही शानदार खेळी केली आणि 87 चेंडूत 98 धावा केल्या. नार्थ झोनकडून मयंक कुमारने 10 षटकांत 63 धावा देत 4 बळी घेतले. ईस्ट झोनने हा सामना 8 गडी राखून जिंकला आहे.