मुंबई : प्रेमात कोण काय करेल याचा नेम नसतो. कोणी चोरी करतो तर कोणी आणखी काय. त्या खास व्यक्तीसाठी मनात असलेलं प्रेम व्यक्त करण्याची प्रत्येकाची पद्धत ही वेगळी आणि हटकेच असते. टीम इंडियाचा क्रिकेटपटू (Hanuma Vihari) हनुमा विहारीने असंच काही केलं होतं. चेहऱ्यावरुन शांत दिसणारा विहारी प्रेमाबाबत तेवढाच फास्ट असल्याचं समोर आलं आहे. विहारीने त्याच्या प्रेयसीला म्हणजेच प्रीतीला प्रपोज करण्यासाठी भर रात्री चक्क 300 किलोमीटर प्रवास केला. रात्री 2 वाजता प्रेयसीच्या घरी पोहचला. दार ठोठावलं. मनात असलेल्या त्या व्यक्तीला मिळवण्यासाठी विहारीने कुठेही प्रयत्न कमी पडू दिले नाही. (A love story between Team India cricketer Hanuma Vihari and his wife Preethi Raj)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हनुमा आणि प्रीती हे दोघे 19 मे 2019 रोजी विवाह बंधनात अडकले. विहारीने क्रिकेटमध्ये अनेक कारनामे केले आहेत. तर प्रीती फॅशन डिझायनर आहे. प्रीती आणि हनुमा हे अनेक वर्षांपासून रिलेशनमध्ये होते. त्यानंतर हे दोघे कॅंडल लाईट डिनरला भेटले. हनुमाने अचूक वेळ साधली. यावेळेस हनुमाने प्रीतीला लग्नाची मागणी घातली. मग काय प्रीतीनेही हनुमाला लग्नासाठी होकार दिला.   


 


हनुमा प्रीतीवर किती प्रेम करतो, याचा अंदाज आपण या एका घटनेवरुन बांधू शकतो. तर हनुमा 300 किलो मीटर गाडीने प्रवास करत भर रात्री प्रीतीच्या घरी पोहचला. विहारी आणि त्याच्या ललित नावाच्या एका मित्राने याबाबतचा खुलासा क्रिकबझच्या 'स्पायसी पिच' या विशेष कार्यक्रमादरम्यान केला होता.


ललित काय म्हणाला?  


"लग्नाआधी प्रीती हैदराबादपासून 300 किमी दूर असलेल्या वारंगल येथे राहायची. हनुमा तिला भेटण्यासाठी गाडी घेऊन तयार होता. याबाबत जेव्हा मला हनुमाने मला सांगितलं तेव्हा माझ्या एका हातात बिर्याणीचं ताट होतं. तर दुसऱ्या हातात सांभार भात. मी सोबत येण्यासाठी हनुमाला नकार दिला. पण अखेर हनुमामुळे मला जावं लागलं. हनुमा प्रीताला भेटण्यासाठी इतका उत्सुक झाला होता की, मला त्याने हातातील ताट देखील खाली ठेवू दिला नाही. हनुमा मला होतो त्याच स्थितीत गाडीत घेऊन गेला. त्यानंतर हनुमाने गाडी चालवायला सुरुवात केली", असं ललितने स्पष्ट केलं.  


पुढे विहारी म्हणला की, "आम्ही अखेर 300 किमी प्रवास करुन प्रीतीच्या घराजवळ पोहचलो. पण प्रीतीच्या घराचं गेट बंद होतं. मी प्रीतीला कॉल करुन गेटजवळ येण्यास सांगितलं. पण प्रीतीने येण्यास नकार दिला. त्यामुळे मी निराश झालो. पण ललितने मला एक भन्नाट आयडिया दिली. ललिनेत गेटच्या भितींवरुन आत जाण्याचा सल्ला दिला. पण मी नकार दिला.", असं विहारीने सांगितलं. पण यानंतर ललितने हुनमा भिंतीवरुन उडी टाकून आत गेल्याचं म्हटलं.    


हनुमा आणि प्रीतीची पहिली भेट


हनुमा आणि प्रीती या दोघांची पहिली भेट ही एका कॉमन मित्राद्वारे झाली होती. सुरुवातीला हे दोघे एकमेकांसोबत फार बोलत नसत. पण नंतर नंतर दोघांचा एकमेकांप्रती असलेला ओढा वाढला. यानंतर दोघे रिलेशनमध्ये आले. जवळपास 7 वर्ष दोघे नातेसंबंधात होते. यानंतर विहारीने प्रीताला लग्नासाठी मागणी घातली. दोघांच्या घरच्यांनी परवानगी दिल्यानंतर दोघे विवाहबद्ध झाले.  


संबंधित बातम्या : 


IPL 2021 उर्वरित सामन्यात 2 मोठे बदल, BCCIकडून लवकरच घोषणा