IPL 2021 उर्वरित सामन्यात 2 मोठे बदल, BCCIकडून लवकरच घोषणा

आयपीएलचे उर्वरित 31 सामने UAEमध्ये होणार, या सामन्यांच्या नियोजनात 2 मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

Updated: Jun 5, 2021, 04:25 PM IST
IPL 2021 उर्वरित सामन्यात 2 मोठे बदल, BCCIकडून लवकरच घोषणा title=

मुंबई: आयपीएलचे उर्वरित सामने सप्टेंबर आणि ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. या सामन्यांचं आयोजित करण्यात आलं आहे. बीसीसीआयने आयपीएल 2021ची UAEमध्ये तयारी सुरू केली आहे. बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांच्यासह अनेक उच्च पदाधिकारी सध्या दुबईमध्ये या मेगा टी -20 लीगवर चर्चा करण्यासाठी उपस्थित आहेत. IPLच्या उर्वरित 31 सामन्यांच्या वेळापत्रकात बदल जाहीर केले जाऊ शकतात. 

काय आहे BCCIचा मास्टरप्लॅन?

इनसाइड स्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार आयपीएल 2021 चे उर्वरित 31 सामने 25 दिवसांच्या विंडोमध्ये घेण्याची घोषणा केली जाईल. बीसीसीआय 25 दिवसांच्या विंडोमध्ये 8 डबल हेडर सामने घेण्यात येऊ शकतात. 28 जूनपर्यंत अंतिम वेळापत्रक जारी करण्यात येईल असं सांगितलं जात आहे. बीसीसीआय आयपीएलचा दुसरा टप्पा 17 ते 19 सप्टेंबर दरम्यान सुरू करण्याचा विचार सध्या सुरू आहे. 

प्लेऑफ आणि नॉकआऊटचे सामने एकाच ठिकाणी खेळवले जाण्याची शक्यता आहे. दुबईमध्ये हे सामने घेतले जाण्याची शक्यता असल्याचंही सांगितलं आहे. तर फ्रानचायझीला आपल्या खेळाडूंसाठी हॉटेल बुक करावी लागणार आहे. 

IPL सामने पाहण्यासाठी नागरिकांना स्टेडियममध्ये कोव्हिडचे नियम पाळून परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे. 31 सामने दुबई, अबु धाबी आणि शारजाह या तीन शहरांमध्ये होण्याची शक्यता आहे. 30 टक्के चाहत्यांना स्टेडियममध्ये सामना पाहण्याची परवानगी देखील दिली जाऊ शकते. याचं कारण म्हणजे 70 टक्के तिथल्या नागरिकांनी कोरोनाची लस घेतली आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला जाऊ शकतो.